घरताज्या घडामोडीजनतेलाच ईडीची धमकी देणार्‍या भाजपला त्यांची जागा दाखवून द्या - महेश तपासे

जनतेलाच ईडीची धमकी देणार्‍या भाजपला त्यांची जागा दाखवून द्या – महेश तपासे

Subscribe

कोल्हापूर पोटनिवडणूकीत मतदारांना ईडीची धमकी देण्यापर्यंत भाजपची मजल गेली असून जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केले आहे.

कोल्हापूर पोटनिवडणूकीत पेटीएमद्वारे मतदारांना पैसे दिले जातात असा आरोप भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी केला असून हा आरोप चुकीचा, बिनबुडाचा व तथ्यहिन असल्याचे थेट प्रत्युत्तर महेश तपासे यांनी दिले आहे.

- Advertisement -

भाजपला पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचा विजय दिसत असल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. जर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुरावे असतील तर त्याचे पुरावे निवडणूक आयोगाला द्यावेत असेही महेश तपासे म्हणाले.


हेही वाचा : Mahanaryaman Scindia: क्रिकेटच्या मैदानात ज्योतिरादित्य शिंदेंच्या मुलाची एन्ट्री, मिळाली ही जबाबदारी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -