घरमहाराष्ट्रपुणेShiv Jayanti 2024 : राज्यासह देशभरात शिवजयंतीचा उत्साह, शिवनेरीवर पोलीस बंदोबस्त

Shiv Jayanti 2024 : राज्यासह देशभरात शिवजयंतीचा उत्साह, शिवनेरीवर पोलीस बंदोबस्त

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती ही राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. तारखेप्रमाणे ही जयंती साजरी करण्यात येत असून ठिकठिकाणी शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

पुणे : राज्यासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. तारखेप्रमाणे ही जयंती साजरी करण्यात येत असून ठिकठिकाणी शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. या निमित्ताने आज राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिर आणि मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या शिवनेरी गडावर पहाटेपासून शिवभक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. (Shiv Jayanti excitement across country including Maharashtra, heavy police deployment at Shivneri)

हेही वाचा… हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज

- Advertisement -

शिवनेरी किल्ल्यावर तारखेप्रमाणे साजरी करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शासकीय जयंती सोहळा पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेले किल्ले शिवनेरीवर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. त्यासोबतच फुलांची सजावटही करण्यात आलेली आहे. काही शिवभक्त शिवज्योत घेऊन रात्रीच गडावर पोहोचले असून आता पुन्हा ती शिवज्योत शिवभक्त आपल्या गावी घेऊन जाऊ लागले आहेत. सोलापुरात शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री 12 वाजता पाळणा सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी सोलापूर शहराच्या मध्यभागी असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवभक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळाली.

किल्ले शिवनेरी येथे मोठ्या संख्येने शिवभक्त येणार असल्याने या सोहळ्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी 1 हजार 100 पोलीस आणि होमगार्डचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथे होणारा शासकीय कार्यक्रम लवकर संपविण्यात येणार आहे. त्यामुळे 10 वाजल्यानंतर शिवभक्तांनी गड चढायला सुरुवात करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

महत्त्वाची बाब म्हणजे शिवनेरी गडावरील शिवजंतीचा पाळणा पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा होत असते. यावेळेस या सभेचे ठिकाण बदलण्यात आले आहे. यंदा मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या ठिकाणात बदल करण्यात आला असून ही सभा गडावरील शिवजन्माच्या ठिकाणाच्या पलिकडे होणार आहे. त्यासाठी पुरातत्व विभागाने परवानगी दिली आहे. दरवर्षी ही सभा गडाच्या सुरुवातीच्या ठिकाणीच होत असे. परंतु, यंदा हे ठिकाण बदलण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -