घरदेश-विदेशदेशाचा जीडीपी ५ टक्क्यांवर घसरला

देशाचा जीडीपी ५ टक्क्यांवर घसरला

Subscribe

देशावर आर्थिक मंदीचे वादळ घोंघावत असताना जीडीपीमध्ये सुद्धा घसरण झाल्याने देशाच्या आर्थिक संकटात आणखीनच भर पडली आहे.

विविध क्षेत्रांवर आर्थिक मंदीचे वादळ घोंगावत असताना तसेच त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु असताना जीडीपीचा दर घटल्याचे चिंताजनक वृत्त समोर आले आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये देशाच्या जीडीपी मध्ये घट होऊन जीडीपी पाच टक्क्यांवर आला आहे. गेल्या सहा वर्षांतील जीडीपीच्या वाढीचा हा निचांक आहे. जीडीपीच्या वाढीमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली घट केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांसाठी मोठा धक्का असल्याचे मत व्यक्त होत आहे.

हेही वाचा – देशातील १० बँकांचे विलीनीकरण; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा

मागील वर्षीचा जीडीपी ८.२ टक्के

नुकताच चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा (एप्रिल ते जून) या कालावधीचा जीडीपीचा आकडा समोर आला आहे. या काळात जीडीपीची वाढ घटली आहे. ही वाढ घटून जीडीपी पाच टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्यावर्षी याच काळात जीडीपीमध्ये ८.२ टक्के एवढी वाढ नोंदवण्यात आली होती. पण यंदा जीडीपीच्या वाढीमध्ये मोठी घट झाल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवरील संकटात आणखीनच भर पडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -