घरदेश-विदेशमोदी देणार नवनिर्वाचित खासदारांना मेजवानी

मोदी देणार नवनिर्वाचित खासदारांना मेजवानी

Subscribe

लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये जेवणाच्या मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या घवघवीत यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सदस्यांसाठी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मेजवानीचे आयोजन केले आहे. लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदारांसाठी रात्रीच्या जेवणाची मेजवानी करण्यात आली असून लोकसभेचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत येत्या २० जून रोजी दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये जेवणाच्या मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक देश एक निवडणूक हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचलून धरला होता. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी एक पाऊल पुढे जात बैठक बोलावली आहे. देशात अनेक दिवसांपासून एक देश, एक निवडणूक या मुद्द्यावर चर्चा सुरु आहे. याच विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांची बैठक बोलविली आहे. या बैठकीत राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. दुपारी ३ वाजता संसद भवनाच्या लायब्रेरीमध्ये ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलुगू देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – मोदींनी दिल्या राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

- Advertisement -

हेही वाचा – फडणवीसांची टीम आणि मोदींचा फॉर्म्युला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -