घरदेश-विदेशजे सरकार कलम 370 हटवू शकतं ते सरकार शिवनेरीवर..., अमोल कोल्हेंचा लोकसभेत...

जे सरकार कलम 370 हटवू शकतं ते सरकार शिवनेरीवर…, अमोल कोल्हेंचा लोकसभेत हल्लाबोल

Subscribe

नवी दिल्ली – पुरातत्व खात्याच्या नियमांमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असणाऱ्या किल्ले शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा ध्वज फडकवला जात नाही. हाच मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत उपस्थित केला. जे सरकार कलम ३७० हटवू शकतं ते सरकार शिवनेरीवर कायमचा भगवा लावण्यास परवानगी देईल का? असा सवाल त्यांनी विचारला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव ठेवताना ते बोलत होते.

ब्रिटिशकालीन कायद्यात बदल करण्याची गरज आहे. पूर्ण देशाची प्रेरणा असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असणाऱ्या किल्ले शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा ध्वज लावता येत नाही. जे सरकार 370 हटवू शकते. तेच सरकार पुरातत्व खात्याच्या जुन्या कायद्यात बदल करून किल्ले शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा ध्वज लावू शकत नाही का, असा प्रश्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला.

- Advertisement -

बैलांचा समावेश वन्य प्राण्यांच्या यादीत करा

गोवंशाच्या वाढीसाठी असलेल्या बैलाचा समावेश वाघ, सिंह, अस्वल यासारख्या वन्य प्राण्यांच्या यादीत आहे. बीफ निर्यातीत भारताने 10 व्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर उसळण घेतली. त्यामुळे भारताविरोधात असलेले, आंतरराष्ट्रीय समुदायाशी संबंधित गट जलीकट्टू, बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यासाठी वारंवार कोर्टात धाव घेत असल्याचा आरोप डॉ. कोल्हे यांनी केला. सरकारने बैलाला Non Performing Animals (Registration) Rules मधून वगळण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केली.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -