घरदेश-विदेशबोरिस जॉन्सन यांना पार्टीगेट प्रकरणातून पडायचे बाहेर; नव्या अधिकाऱ्यांची केली नियुक्ती

बोरिस जॉन्सन यांना पार्टीगेट प्रकरणातून पडायचे बाहेर; नव्या अधिकाऱ्यांची केली नियुक्ती

Subscribe

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ‘पार्टीगेट’ प्रकरणात बाहेर पडण्यासाठी आता त्यांनी कार्यालयात संपर्क प्रमुखासह नवीन वरिष्ठ अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. पंतप्रधानांनी लंडनच्या महापौर पदाची जबाबदारी त्यांचे सहकारी गुटो हॅरी यांच्याकडे सोपवली आहे, ज्यांनी अलीकडेच जॉन्सन यांच्यावर टीका केली होती. मात्र अनेक आठवड्यांच्या गोंधळानंतर जॉन्सन यांनी सरकारवर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून नवीन अधिकार्‍यांच्या नियुक्तीला वेग दिला आहे. त्यांनी वरिष्ठ कॅबिनेट मंत्री स्टीव्ह बार्कले यांची आपले नवीन ‘चीफ ऑफ स्टाफ’ म्हणून नियुक्ती केली आहे.

जॉन्सन यांना 2020 आणि 2021 मध्ये कोरोनाविरोधी निर्बंधांदरम्यान केलेल्या पार्टीप्रकरणी खूप अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणामुळे आता जॉन्सन यांची सत्तेवरील पकड कमकुवत होत जातेय. दरम्यान वरिष्ठ नागरी सेवक सू ग्रे यांनी अशा एकूण 16 पार्टींची चौकशी केली आहे, यातील काही प्रकरणांची चौकशी मेट्रोपॉलिटन पोलिसांकडूनही सुरु आहे.

- Advertisement -

गेल्या दोन वर्षांत बोरिस जॉन्सन यांच्या १० डाऊनिंग स्ट्रीट स्थित कार्यालय आणि निवासस्थान तसंच इतर सरकारी कार्यालयांत आयोजित कथित पार्टीशी संबंधित संभाव्य लॉकडाउन उल्लंघनाची चौकशी केली जाईल, मेट्रोपॉलिटन पोलिसांनी म्हटले आहे. गेल्या आठवड्यात या चौकशीचा एक अंतरिम अहवाल समोर आल्यानंतर, जॉन्सनने माफी मागितली आणि त्यांच्या कार्यालयातील समस्यांवर लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

याचदरम्यान बोरिस जॉन्सन यांना शुक्रवारी एक मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांच्या कार्यालयातील पाच उच्च अधिकाऱ्यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला आहे. पार्टीगेट प्रकरणामुळे वाढत्या वादामुळे हा राजीनामा दिल्याचे म्हटले जातेय.


NEET PG 2022 परीक्षा पुढे ढकलण्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -