हौतात्म्य पत्करलं त्यांचा आणि महाराष्ट्राचा हा अपमान, संजय राऊतांचा मोदींवर पलटवार

महाराष्ट्रामुळे महामारी आली म्हणजे हा डॉक्टर्स, नर्स आणि सरकार यांचा हा अपमान आहे. हौतात्म्य पत्करलं त्यांचा आणि महाराष्ट्राचा हा अपमान आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी याबाबत पुढं येऊन बोलायला हवं. सोनू सूद त्यावेळी कोणाचे होते ? राज्यपाल हस्ते सत्कार करणारे कोण होते ? कौतुक कुणी केलं, असा सवालही शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी उपस्थित केलाय.

Sanjay Raut targets pm modi said center agency Separate syndicate started with BJP leaders

मुंबईः पंतप्रधान मोदी यांचे भाषण मी ऐकलं, वाचलं. भाषण मोदी यांचं होतं, पण महाराष्ट्राबाबत वक्तव्य केलं म्हणून महाराष्ट्र सरकारकडून त्याचा खुलासा व्हावा. मला ऐकून वाईट वाटलं. महामारीचा उगम चीनमधून झालाय, महाराष्ट्रावर खापर फोडणं योग्य नाही, Who ने धारावी पॅटर्नची वाहवा केलीय. महाराष्ट्रामुळे महामारी आली म्हणजे हा डॉक्टर्स, नर्स आणि सरकार यांचा अपमान आहे. हौतात्म्य पत्करलं त्यांचा आणि महाराष्ट्राचा हा अपमान आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी याबाबत पुढं येऊन बोलायला हवं. सोनू सूद त्यावेळी कोणाचे होते ? राज्यपाल हस्ते सत्कार करणारे कोण होते ? कौतुक कुणी केलं, असा सवालही शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी उपस्थित केलाय.

संजय राऊत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. त्यावेळी मोदींनी संसदेत कोरोनासंदर्भात केलेल्या विधानावर त्यांनी आक्षेप घेत पलटवार केलाय. महाराष्ट्राविषय जो त्यांनी उल्लेख केलाय, तर माझं असं म्हणणं आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारच्या वतीनेच खुलासा व्हायला हवा. मी इथे बसून बोलणार नाही. मुंबई आणि महाराष्ट्रामुळे ही महामारी पसरली असं सांगणं हा महाराष्ट्रातल्या साडे अकरा कोटी जनतेचा, लोकनियुक्त सरकारचा आणि ज्या डॉक्टरांनी, नर्सेसनी, ज्या परिचारिकांनी सातत्याने काम केले. जागतिक आरोग्य संघटनेनं धारावी पॅटर्नचं कौतुक केलंय. महाराष्ट्र सरकार कसं काम करतंय याचे दाखले सुप्रीम कोर्टानं, हाय कोर्टानं इतरांना दिले होते. हौतात्म्य पत्करलं त्यांचा आणि महाराष्ट्राचा हा अपमान आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी देखील बोलायला हवं, असं संजय राऊत म्हणालेत.

संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर बोलताना सोनू सूद हे कोणाचे होते, सोनू सूदला राज्यपालांकडे कोण घेऊन जातं होतं, असा सवाल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी बोलावं, असं ते म्हणाले. राज्य सरकारमध्ये बसलेल्यांनी बोलावं, प्रत्येक वेळी बोलायला मी ठेका घेतलाय का?, असंही संजय राऊत म्हणालेत.

त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जावं, देशात कायदा आहे

किरीट सोमय्यांच्या आरोपांचं पोलीस पाहतील. किरीट सोमय्यांनी राज्यपालांकडे जावं, त्यांनी जो बायडन यांना भेटावं, आंतरराष्ट्रीय न्यायलयात जावं. कायद्याचं राज्य आहे, कोणावरही खुनी हल्ला झाला असेल तर कायदा काम करतो, असं देखील संजय राऊत म्हणाले न्यायालयांचे मालक आम्ही नाही, न्यायलयांचे मालक कोण आहे ते सर्वांना माहिती आहे, असंही त्यांनी अधोरेखित केले.


हेही वाचा : OBC Reservation : ओबीसींना ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मिळणार, विजय वडेट्टीवारांकडून विश्वास व्यक्त