घरदेश-विदेशArvind Kejriwal : ...तर नवऱ्याला जेवायला वाढू नका; केजरीवालांचा महिलांना जगावेगळा सल्ला

Arvind Kejriwal : …तर नवऱ्याला जेवायला वाढू नका; केजरीवालांचा महिलांना जगावेगळा सल्ला

Subscribe

नवी दिल्ली : दिल्लीत आप अर्थात आम आदमी पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिला मतदारांना अजब सल्ला देत नवऱ्यांना जेवायलाच देऊ नका, असे सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकांचे बिगुल अवघ्या काही दिवसांमध्येच वाजण्याची शक्यता आहे. देशभरात सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि भाजपने दिल्लीतील उमेदवारांची घोषणा केली आहे. दिल्लीतल्या सात जागांसाठी दोन्ही पक्षांमध्ये मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली आहे. आप पक्षाचा महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्याकडे अधिक कल आहे. यातूनच मुख्यमंत्री केजरीवाल यांनी महिलांना एक जगावेगळा सल्ला दिला आहे. पतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जप केल्यास त्यांना जेवण देऊ नये, असे केजरीवाल यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – LokSabha 2024 : ‘शिल्लक शिवसेनेच्या प्रमुखांनी…’; कीर्तिकरांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस नेता भडकला

आम आदमी पक्षाने शनिवारी दिल्लीच्या सिव्हिक सेंटरमध्ये आयोजित केलेल्या महिला सन्मान सोहळ्यापासून आपल्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच आलेल्या दिल्लीच्या अर्थसंकल्पात महिला सन्मान योजनेंतर्गत 1000 रुपये देण्याची घोषणा आप सरकारतर्फे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या कार्यक्रमातून दिल्लीतील महिला मतदारांची भेट घेतली. यावेळी केजरीवाल यांनी महिला मतदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

भाजपाने तुमच्यासाठी काय केले?

अरविंद केजरीवाल यांनी महिलांना पतीला मनवण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे. “तुमचा नवरा मोदी-मोदी करत असेल तर त्याला जेवण देऊ नका, त्याला डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला सांगा,” असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं. “मी त्यांची वीज मोफत केली आहे, त्यांची बसची तिकिटे मोफत केली आहेत आणि आता मी महिलांना दरमहा एक हजार रुपये देत आहे, हे पण तुमच्या पतीला सांगा. भाजपने त्यांच्यासाठी काय केले, मग भाजपला मत का द्यायचे? यावेळी केजरीवाल यांना मत द्या,” असेही केजरीवाल म्हणाले. “घरी बसू नका, ते अतिशय धोकादायक आहे. आपला पती, भाऊ, वडील आणि परिसरातील इतर लोकांना आपल्या फायद्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला मतदान करण्यासाठी पटवून देण्याची जबाबदारी आपली आहे,” या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी महिलांना आवाहन केले.

हेही वाचा – Ravindra Waikar : रवींद्र वायकर अखेर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; आज संध्याकाळी वर्षावर पक्षप्रवेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -