घरमनोरंजनराखी बुरख्याच्या आत बिकिनी...फराह खानने सांगितला अतरंगी किस्सा

राखी बुरख्याच्या आत बिकिनी…फराह खानने सांगितला अतरंगी किस्सा

Subscribe

ड्रामा क्वीन राखी सावंत फराह खान दिग्दर्शित व शाहरुख खान व सुश्मिता सेनच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘मै हूं ना’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटासाठी राखी बुरखा घालून ऑडिशन द्यायला आली होती.  यावेळी ‘मैं हूं ना’ या सिनेमाशी संबंधित एक विचित्र किस्सा फराह खानने सांगितला आहे. फराहने या सिनेमाचे कास्टिंग कसे झाले, याविषयी सांगितले. दिग्दर्शक म्हणून हा फराहचा पहिलाच सिनेमा होता.

फराह खानने कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, दार्जिलिंगमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यानंतर दोन दिवसांनी राखी सावंत ‘मैं हूं ना’च्या शूटिंगमध्ये सामील झाली होती. तिने राखीच्या जागी आधी एका वेगळ्या अभिनेत्रीला कास्ट केले होते, मात्र तिच्या आईने शाहरुख ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे, त्याच हॉटेलमध्ये राहण्याची मागणी केली. फराहने असे म्हटले की, ‘तिच्या आईने सांगितले की तीही एका मोठ्या हॉटेलमध्ये राहिल, जिथे शाहरुख थांबला आहे. शूटिंगच्या आधीपासूनच तिचे अनेक नखरे होते.’

- Advertisement -

फराहने सांगितले की तिने तिच्या असिस्टंटला फोन केला आणि विचारले की या भूमिकेसाठी इतर कोणाचे ऑडिशन घेतले आहे का. फराहने सांगितले की तिने राखीचे ऑडिशन पाहिले. त्या ऑडिशनबद्दल सांगताना फराह म्हणाली की, ‘राखी बुरखा घालून ऑडिशनसाठी आलेली. तिला असं पाहून असिस्टंटला जरा धक्काच बसला कारण ही भूमिका एका चंचल मुलीची होती.’

बुरख्याच्या आतमध्ये घातलेली बिकिनी

राखीने तिच्या खास स्टाइलमध्ये त्याला कॅमेरा फिरवण्यास सांगितले. तिने बुरखा काढताच सर्वांना धक्काच बसला, कारण तिने बुरख्याच्या आतमध्ये बिकिनी परिधान केली होती. फराह म्हणाली की, आम्ही तिला लगेच कास्ट केले नव्हते कारण तिचे केस पिंगट होते. जेव्हा ती दार्जिलिंगमध्ये आली, तेव्हा हे केस कसे लपवायचे अशी चिंता फराहला होती. फराह म्हणाली की, ‘मी तिला स्वेटर आणि कॅप दिली, जे तिला एक्सपोज करायचे होते. मग मी तिला म्हणायचे की तू या पूर्ण कपड्यांमध्येही सुंदर दिसतेस,” अशी आठवण फराहने सांगितली.

- Advertisement -

राखीसह काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता, असं फराहने सांगितलं. “तिच्यासह काम करणं खूप चांगलं होतं. तिची एकच विनंती होती की तिला गाण्यात शाहरुखच्या पुढे किंवा त्याच्या मागे उभे करावे. त्यातच ती खूश होती,” असं फराह म्हणमाली. ‘मैं हूं ना’हा 2004 मधील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता.

__________________________________________________________

हेही वाचा : पोटगीचा उल्लेख करत मलायका म्हणाली, ‘आमचा घटस्फोट…’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -