घरताज्या घडामोडीआंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडूंच्या सभेत पुन्हा चेंगराचेंगरी, ३ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडूंच्या सभेत पुन्हा चेंगराचेंगरी, ३ जणांचा मृत्यू

Subscribe

आंध्र प्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या जाहीर सभेत पुन्हा एकदा चेंगराचेंगरी झाली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच नायडू यांच्या जाहीर सभेदरम्यान नेल्लोरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, आता चंद्राबाबू नायडू यांच्या रोड शोमध्ये दुसऱ्यांदा चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

नायडू जाहीर सभेतून निघाल्यानंतर ही चेंगराचेंगरी झाली. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. टीडीपीने रेशन किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये मोठ्या संख्येने लोक आले होते.

यापूर्वी, २८ डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकूर येथे टीडीपीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात
चेंगराचेंगरी झाली होती. तसेच ८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. नायडू यांनी या घटनेनंतर त्यांची बैठक रद्द केली होती आणि प्राण गमावलेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. याशिवाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मृतांच्या कुटुंबियांना भरपाई जाहीर केली होती. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली होती.

- Advertisement -

हेही वाचा : हे अस्वीकारार्ह आहे..; राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत काँग्रेसचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -