घरदेश-विदेशCBSE चा दहावीचा निकाल जाहीर; ९१.१० विद्यार्थी उतीर्ण

CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; ९१.१० विद्यार्थी उतीर्ण

Subscribe

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसई विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ९१.१० विद्यार्थी उतीर्ण झाले असून मागील वर्षाच्या तुलनेत ४.४० टक्क्यांनी निकाल वाढला आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसई विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. केंद्रीय विद्यालयाचे ९१. १० टक्के विद्यार्थी उतीर्ण झाले असून त्रिवेंद्रम विभागाचा ९९.८५ टक्के असा सर्वाधिक निकाल लागला आहे. तर चेन्नई विभागाचा ९९ टक्के निकाल लागला असून अजमेर विभागाचा ९५.८९ टक्के निकाल लागला आहे. यंदाचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत ४.४० टक्क्यांनी वाढला आहे. यंदा १८ लाख विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असून १३ विद्यार्थ्यांना ५०० पैकी ४९९ गुण मिळाले आहेत. तर नवी मुंबईतील दिपच्ना पांडा, ठाण्यातील अॅडरी दास आणि दात्री कौशल मेहता हे महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावला आहे.

- Advertisement -

१३ जणांना ५०० पैकी ४९९ गुण

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसई विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून या निकालात १३ जणांना ५०० पैकी ४९९ गुण मिळाले आहेत. या विद्यार्थ्यांनमधून ८ विद्यार्थींनींचा आणि सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी यूपीतले असून या विद्यार्थ्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. 

- Advertisement -

असा पाहा निकाल

cbse.nic.in आणि cbseresults.nic.in या संकेतस्थळावर जा

संकेतस्थाळावर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा

बैठक क्रमांक टाका

निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल

निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -