घरदेश-विदेशसेक्सला नकार दिल्याने तृतीयपंथीयावर झाडली गोळी

सेक्सला नकार दिल्याने तृतीयपंथीयावर झाडली गोळी

Subscribe

एका तृत्तीयपंथीयाने बलात्काराला विरोध केल्याने त्याच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना दिल्लीमधील त्रिलोकपुरी येथे घडली आहे.

देशात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढ असून, काही केल्या या घटना कमी व्हायला तयार नाहीत. देशात आज कोणत्याच वयोगटातील महिला सुरक्षित नाहीत अगदी तीन वर्षांच्या चिमुकलीपासून ते सत्तर वर्षांच्या वयोवृद्ध महिलेवरदेखील बलात्कार होत असताना आता तृत्तीयपंथीयावर देखील बलात्कार होत असल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये एका तृत्तीयपंथीयाने बलात्काराला विरोध केल्याने त्याच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नेमके काय घडले?

दिल्लीतील त्रिलोकपुरी भागातील बारापुल्लाह रोडवर काजल (२१) ही एक तरुणी रिक्षाची वाट पाहत उभी होती. त्यादरम्यान, एक तरुण त्याठिकाणी गाडी घेऊन आला. त्या तरुणाने तिला लिफ्टची ऑफर केली. तिने गाडीत पाहिले असता त्या तरुणासोबत त्याचा मित्र देखील होता. सागर कुमार असे या तरुणाचे नाव असल्याचे त्यांनी तरुणीला सांगितले. मात्र थोड्या अंतरावर गेल्यावर सागर आणि त्याच्या मित्राने काजलवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने त्यांना विरोध केला. बलात्काराच्या प्रयत्नात असतानाच त्यांना काजल ही महिला नसून तृतीयपंथी असल्याचे समजले. त्यानंतर ते काजलवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरस्ती करायला लागले. मात्र काजल ऐकत नसल्याचे बघून त्यांनी तिला गाडीतून बाहेर फेकले आणि तिच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात तिच्या पोटाला गोळी लागल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. त्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या काही प्रवाशांनी याबाबत पोलिसांना कळविले आणि काजलला रुग्णालयात तात्काळ दाखल केले आहे. काजलने दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी सागर कुमारला अटक करण्यात आली असून त्याचा मित्र कांत फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

वाचा – बापरे!२०१३ पासून मुंबईतून २,२६४ महिला बेपत्ता


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -