घरदेश-विदेशबिहारमध्ये दोन आरजेडी नेत्यांवर गोळीबार

बिहारमध्ये दोन आरजेडी नेत्यांवर गोळीबार

Subscribe

शेरना पूलाजवळ गुरुवारी रात्री बाईकवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी आरजेडीचे नेता उमाशंकर प्रसाद राय आणि सुरेंदर राय यांच्यावर गोळ्या झाडल्या.

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या दोन नेत्यांवर गोळ्या झाडून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुजफ्फरपूरच्या कांटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. शेरना पूलाजवळ गुरुवारी रात्री बाईकवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी आरजेडीचे नेता उमाशंकर प्रसाद राय आणि सुरेंदर राय यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये दोघे जण ही गंभीर जखमी झाले आहेत. दोघे जण ही कांटी येथील बलहा गावामध्ये असलेले लग्नकार्यासाठी गेले होते. लग्नकार्य आटोपल्यानंतर दोघेही बाईकवरुन घरी परत येत होते. त्याच दरमयान शेरना पुलावर आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबारामध्ये सुरेंद्र राय यांना एक आणि उमाशंकर राय यांच्या पाठीवर चार गोल्या लागल्या.

- Advertisement -

अशी घडली घटना 

गोळ्या लागून देखील आरजेडीचे दोन्ही नेते घटनास्थळावरुन पळून गेले आणि त्यांनी थेट कांटी येथील हॉस्पिटल गाठले. त्याठिकाणी दोघांवर प्राथमिक उपचार करुन त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. उमाशंकर यांची प्रकृती नाजूक आहे. जखमी झालेल्या सुरेंद्र राय यांनी सांगितले की, उमेश राय यांच्या मुलीचे लग्न होते. लग्नावरुन परत घराकडे येत असताना ते बुलेट चालवत होते. गाडीवर उमाशंकर राय मागे बसले होते. शेरना पूलावर येताच गोळीबाराचा आवाज आला. उमाशंकर यांनी सांगितले की कोणी तरी मागून गोळ्या धाडत आहे. असे ऐकताच मी बुलेटचा स्पीड वाढवला. आरोपींनी आमचा पाठलाग करत आमच्यावर गोळ्या झाडल्या. जवळपास ८ ते १० राऊंड त्यांनी गोळीबार केला.

- Advertisement -

आरोपींचा शोध सुरु

आरजेडी नेत्यावर गोळीबार केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. रात्री उशिरा त्यांनी बैरिया येथील हॉस्पिटलमध्ये जाऊन दोन्ही नेत्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन माहिती घेतली. याप्रकरणी त्यांनी जखमी सुरेंद्र राय यांचा जबाब नोंदवला. हा गोळीबार कोणी आणि कोणत्या कारणासाठी केला याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -