घरमुंबईमुंबईत आनंदधारा...

मुंबईत आनंदधारा…

Subscribe

मुंबईसह उभ्या महाराष्ट्राचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागलेले असताना गुरुवारी दुपारी मुंबईसह ठाण्यात सरींचे जोरदार आगमन झाल्याने मुंबईकर सुखावला. मान्सून नसला तरी आनंदधारा घेऊन आलेल्या या मान्सूनला वाढत्या उकाड्याने त्रस्त झालेला मुंबईकरांना वातावरण थोडा गारावा अनुभवयाला मिळाला खरा पण पाऊस थांबल्यानंतर पुन्हा एकदा तापमानाचा पारा चढल्याने मुंबईकर हैराण झाला होता.

वार्‍यासह आलेल्या या पावसामुळे मुंबईत गेल्या २४ तासांत १३१ ठिकाणी फांद्या आणि झाडे पडण्याच्या घटना नोंदविण्यात आलेल्या आहेत. तर शुक्रवारीही मुंबईसह ठाणे आणि उपनगरात अशाच हलक्या ते मध्यम सरी कोसळतील असा अदांज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

- Advertisement -

देशभरात सध्या वायू या चक्रीवादळाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यातच मान्सूनच्या आगमनाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ऊन- सावल्यांचा खेळ सुरू झाल्याने सर्वांचे लक्ष वरुणराजाच्या आगमनाकडे लागून राहिले होते. बुधवारी सरींनी लंपडाव खेळल्यानंतर बुधवारी दुपारी पावसाने वार्‍यासह आगमन करीत मुंबईकरांना सुखद धक्का दिला. वायू चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीकडून पुढे सरकल्यानंतरही शुक्रवारी समुद्राच्या लाटांना उधाण आले होते.

शुक्रवारी दिवसभरात उपनगरांमध्ये झालेल्या पावसाने सायं. ५.३० पर्यंत सांताक्रूझ येथे १० मिलीमीटर तर कुलाबा येथे तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर किमान तापमान सांताक्रूझ येथे २४.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे तापमान सरासरीहून २.५ अंशांनी कमी होते. मात्र कमाल तापमान पुन्हा चढून ३४.५ अंशांवर पोहोचले. कुलाबा येथे किमान तापमान २६.० अंश तर कमाल तापमान ३२.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सांताक्रूझ येथे आर्द्रता ८१ टक्के तर कुलाबा येथे ९७ टक्के होती. त्यामुळे पावसाच्या धारांनंतर लगेचच घामाच्या धारांचाही अनुभव मुंबईकरांनी घेतला.

- Advertisement -

पाऊस पडला असला तरी अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नाही. पण त्याअगोदरच मुंबईत झाडे पडण्याच्या घटनांत वाढ झाल्याने मुंबईकरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी मुंबई शहरात ४३, पूर्व उपनगरात २९ तर पश्चिम उपनगरात तब्बल ५९ ठिकाणी फांद्या किंवा झाडे पडण्याच्या तक्रारी महापालिकेकडे नोंदवल्या गेल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -