घरताज्या घडामोडीमगरीच्या गळ्यात अडकलेला टायर काढा, श्रीमंत व्हा

मगरीच्या गळ्यात अडकलेला टायर काढा, श्रीमंत व्हा

Subscribe

जर तुम्ही धाडसी आहात. चांगल्या नोकरीच्या शोधात आहात आणि तुम्हांला बक्कळ पैसा कमवायचा आहे. तर मग इंडोनेशियात तुमचं स्वागत आहे. कारण येथे एका मगरीने सरकारची झोप उडवली आहे. गेल्या चार वर्षांपासून तिच्या गळ्यात एक टायर अडकला असून तो काढण्याचा प्रयत्न करून येथील सरकार पुरती थकली आहे. यामुळे त्यांनी या मगरीच्या गळ्यातला टायर काढणाऱ्या व्यक्तीला ‘हवं ते मागा आणि श्रीमंत व्हा’ असे बक्षिस जाहीर केले आहे.

येथील सुलावेसी प्रांतातील पालू शहरात ही मगर आहे. २०१६ साली नदीत विहार करत असताना तिच्या गळ्यात मोटरसायकलचा एक टायर अडकला. तो काढण्याचा अनेकांनी प्रयत्नही केला. पण काहीवेळा मगर पळून गेली तर काही वेळा टायर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर मगरीने हल्ला केला. यामुळे वनविभागाने या मगरीचा नाद सोडून दिला. याला आता चार वर्ष उलटले आहेत. या कालावधीत मगरही १३ फूट लांबीचे झाले आहे. आकारमान वाढल्याने या टायरचा फास आता तिच्या गळ्याला बसत आहे. यामुळे या मगरीच्या गळ्यात अडकलेला टायर काढणाऱ्याला इंडोनेशिया सरकारने मागेल ते मिळेल बक्षिस जाहीर केले आहे. यामुळे अनेकजण मगरीच्या गळ्यातील टायर काढण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -