घरदेश-विदेशडायरेक्ट सेलिंग कंपन्यांना आता करोडपती होण्याचे स्वप्न दाखवता येणार नाही

डायरेक्ट सेलिंग कंपन्यांना आता करोडपती होण्याचे स्वप्न दाखवता येणार नाही

Subscribe

डायरेक्ट सेलिंग कंपन्या यापुढे पिरॅमिड स्कीम चालवू शकणार नाही.

एक ठराविक वस्तू खरेदी करत किंवा रक्कम भरत आपल्या ओळखीतल्या लोकांनाही त्याप्रमाणे करायला सांगत मोठा नफा कमवता येऊ शकतो अशी अमिष दाखवणाऱ्या कंपन्यांना तुम्ही देखील अनेकदा भुलला असाल. यात तुमचे देखील पैसे बुडले असतील. मात्र आता काळजी करु नका, कारण अशा डायरेक्ट सेलिंग करत ग्राहकांना भूलथापा देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार आहे. कारण डायरेक्ट सेलिंग कंपन्या यापुढे पिरॅमिड स्कीम चालू नका असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. अशा कंपन्यांसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. तसेच या कंपन्यांना त्यांच्या स्कीमचा प्रचार करण्यावरही बंधने घातली आहेत. यामुळे Amway, Tupperware आणि Oriflame सारख्या कंपन्यांना आता ९० दिवसांच्या आत नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे.

अन्यथा डायरेक्ट सेलिंग करणार्‍या कंपन्यांना त्यांच्या उत्पादने आणि सेवांच्या तक्रारीसाठी जबाबदार धरले जाईल. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ग्राहक संरक्षण (डायरेक्ट सेलिंग) नियम, 2021 ची अधिसूचना जारी केली. यात डायरेक्ट सेलिंग कंपन्यांसह ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर थेट ग्राहकांना वस्तू विकणारे विक्रेत्यांनाही या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. या नवीन नियमांनुसार, डायरेक्ट सेलिंग करणाऱ्या कंपन्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारांवर टाकण्यात आली आहे.

- Advertisement -

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, प्रथमच डायरेक्ट सेलिंग कंपन्या किंवा बिजनेससाठी ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काही नियम निश्चित केले आहेत. यामुळे ग्राहकांना साखळी पद्धतीने ग्राहक जमा करण्यास सांगत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कायद्यानुसार शिक्षा होईल. पिरॅमिड स्कीम चालवणाऱ्या या कंपन्या लोकांना स्वतःशी जोडण्यासाठी वेगवेगळी स्वप्ने दाखवतात. यात ग्राहकांना सेमिनार किंवा प्रत्यक्ष भेटी घेत सांगितले जाते की, जर त्यांनी चार किंवा पाच लोक जोडले तर त्या पाच लोकांनी त्यांच्यासोबत 25 लोक जोडले, तर साखळी आणखी लांबेल. ही साखळी जितकी लांबलचक तितकीच वरपर्यंत पोहोचणाऱ्या ग्राहकांची कमाईही याच पद्धतीने वाढत राहील.

पिरॅमिड स्किम नेमकी असते कशी?

पिरॅमिड स्कीमअंतर्गत, एखाद्या व्यक्तीला आपल्या हाताखाली आणखी लोकं जोडल्यास त्यांची कमाई वाढत जाईल, अशी अमिष दाखवली जातात. अशा स्थितीत पिरॅमिड स्कीमशी पहिल्यांदा जोडलेल्या व्यक्तीची कमाई फारच कमी असते. जसे जसे तुम्ही एक एक व्यक्ती जोडणार तस तशी तुमची कमाई वाढणार असं सांगितले जाते. यात सामील होण्यासाठी अनेकदा तगडी फी आकारली जाते. यामध्ये प्रशिक्षण शुल्क, आवश्यक किट आणि सदस्यत्व शुल्क यासारख्या बाबींचा समावेश आहे. यात पहिल्यांदा ५०० रुपयांपासून जवळपास ५००० रुपयांच्यावर पैसे घेतले जातात.

- Advertisement -

मात्र नवीन नियमांमुळे काय होणार?

मात्र नवीन नियमांनुसार, आता डायरेक्ट सेलिंग कंपन्यांना ग्राहकाशी संपर्क साधण्यापूर्वी पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. तसेच या डायरेक्ट सेलिंग कंपन्यांचा कोणताही विक्रेता ओळखपत्राशिवाय कोणत्याही ग्राहकाकडे जाऊ शकत नाही. तसेच विक्रेते त्यांच्या ग्राहकाला कोणतेही असे वचने देऊ शकत नाही जी त्यांची कंपनी पूर्ण करुच शकत नाही. डायरेक्ट सेलिंग कंपनींच्या विक्रेत्यांना वस्तू किंवा सेवांच्या विक्रीसाठी ग्राहकांशी लेखी करार करावा लागेल. यात विक्रेत्याला त्याच्या ग्राहकाला डायरेक्ट सेलिंग कंपनीचे नाव आणि पत्ता कळवावा लागेल. तसेच ग्राहकाला विक्री, पेमेंट, रिफंट या अटींचे तपशील प्रदान करावे लागेल. याशिवाय ग्राहकाला योग्य आणि अस्सल वस्तू मिळाल्याची खात्री करावी लागेल. तसेच विक्रेत्याने ग्राहकाची वैयक्तिक माहिती इतर कोठेही उघड होणार नाही याची खबरदारी बाळगावी लागेल.


Weather Update : नववर्षात अवकाळी पाऊस, गारपिट महाराष्ट्राला झोडपणार , तर दिल्लीला हुडहुडी भरणार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -