घरदेश-विदेशकॉन्व्हेन्ट शाळेत मुले शिकतात, म्हणून गोमांस खातात

कॉन्व्हेन्ट शाळेत मुले शिकतात, म्हणून गोमांस खातात

Subscribe

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचा दावा

मिशनरी शाळेत जाणारी मुले डॉक्टर, इंजिनिअर होतातच, परंतु परदेशात गेल्यावर तिथे गोमांस खातात, म्हणून मुलांवर योग्य संस्कार झाले पाहिजे, असा दावा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केला. उत्तर प्रदेशातील त्यांच्या बेगुसराय मतदारसंघात एका सभेत ते बोलत होते.

मिशनरी शाळेत शिकलेल्या मुलांपैकी जेवढी मुले परदेशात जातात, त्यातील 10 पैकी 8 ते 9 मुले गोमांस खातात.त्यांच्यावर संस्कार न झाल्याने ते आपला सनातन धर्म विसरून जातात. म्हणून मुलांना लहानपणापासून शाळेत गीतेचे श्लोक आणि हनुमान चालीसा शिकवायला पाहिजे, असेही मंत्री सिंह म्हणाले. सनातन धर्मामुळे आपली लोकशाही जिवंत आहे. आम्हाला कट्टरवादी म्हटले जाते. आमच्या धर्मात कट्टरवादाला स्थान नाही. प्राण्यांना अन्न आणि झाडांना पाणी घातल्यास पुण्य मिळते असे आमच्या धर्मात शिकवले जाते. परंतु ज्या सापाला आम्ही दूध पाजत आहोत तोच आम्हाला डसायला निघाला आहे, असेही सिंह म्हणाले. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत राहणारे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी पुन्हा एकदा उपरोक्त वादग्रस्त विधान केले आहे.

- Advertisement -

शाळांमध्ये हनुमान चालिसा शिकवावा
प्रत्येक शाळांमध्ये गीतेचा पाठ शिकवणे गरजेचे आहे. शाळांच्या संस्थापकांची ज्या देवावर अपार श्रद्धा आहे. त्या देवाची एक मूर्ती शाळांमध्ये स्थापित करायला हवी. त्याचबरोबर शाळांमध्ये दररोज प्रार्थना आणि श्लोक पठण व्हायला हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे हनुमान चालिसा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला हावा, अशी मागणीही मंत्री सिंह यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -