घरताज्या घडामोडीकोरोनाने घेतला केंद्रीय मंत्र्यांचा बळी; रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन

कोरोनाने घेतला केंद्रीय मंत्र्यांचा बळी; रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन

Subscribe

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं निधन झालं आहे. बुधवारी त्यांनी दिल्लीच्या एम्समध्ये वयाच्या ६५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी ११ सप्टेंबर रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती.

- Advertisement -

त्यांनी ट्विट करून सांगितले होतं की, “कोरोना चाचणी केली असता चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी परिस्थिती ठीक आहे. डॉक्टरांचा सल्ला घेत आहे गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि जर काही लक्षणं असतील तर चाचणी करुन घ्या.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरेश अंगडी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “कर्नाटकात पक्षाला बळकट करण्यासाठी परिश्रम घेणारे सुरेश अंगडी हे एक असाधारण कार्यकर्ता होते. ते प्रशंसनीय खासदार आणि प्रभावी मंत्री होते. त्यांचा मृत्यू वेदनादायक आहे. ओम शांती,” असं ट्विट मोदींनी केलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -