घरदेश-विदेशसंपूर्ण देशातील जनतेला मिळणार मोफत कोरोनाची लस; केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य

संपूर्ण देशातील जनतेला मिळणार मोफत कोरोनाची लस; केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य

Subscribe

केवळ बिहार राज्यच नाही, तर देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना लस मोफत मिळेल, असे केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी म्हटले आहे

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७९,९,९६० वर पोहोचली आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४५,१४९नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४८० जणांचा मृत्यू झाला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जाहीरनाम्यात जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनावरून विरोधकांनी भाजपाला चांगलेच धारेवर धरले आहे. दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना लसीबाबत केंद्रीय मंत्र्यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

केवळ बिहार राज्यच नाही, तर देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना लस मोफत मिळेल, असे प्रताप सारंगी यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी हे ओडिशा येथील बालासोरमध्ये बोलत होते. देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना लस मोफत मिळणार असून, एका व्यक्तीला लस उपलब्ध करून देण्यासाठी पाचशे रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. बालासोर येथे पोटनिवडणूक होत असून प्रताप सारंग हे प्रचारासाठी तेथे गेले होते.

- Advertisement -

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील भाजपाच्या या आश्वासनावरून निशाणा साधला आहे. “फक्त बिहारमध्येच का? मोफत लस हा देशातील सर्वच नागरिकांचा हक्क” असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. आतापर्यंत तामिळनाडू, मध्ये प्रदेश, आसाम, पुद्दुचेरीच्या राज्य सरकारांनी आपल्या नागरिकांसाठी मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली आहे. तर संपूर्ण देशातील नागरिकांना मोफत लस द्यावी, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना कोरोना लशीबाबत चर्चा केली होती. भारतातील वैज्ञानिक लस बनवण्यासाठी प्रयत्न करत असून लवकरच ही लस तयार होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तर केंद्र सरकारने नुकतीच कोविड लसीबाबत धोरण आखले आहे. तुमच्या राज्यात विधानसभा निवडणुका कधी आहेत, त्यानुसार तुम्हाला कोरोनावरील लस कधी मिळेल, हे तुम्हाला समजेल, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केली होती. कोरोनावरील लशीचे उत्पादन सुरू झाल्यावर बिहारमधील जनतेला ती लस मोफत उपलब्ध केली जाईल. भाजपाच्या जाहीरनाम्यातील हे पहिले वचन आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.


‘तुम मुझे वोट दो, हम तुम्हे वॅक्सीन देंगे’; भाजपाकडून देश विभागणीचा प्रयत्न? – राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -