घरदेश-विदेशUPSC Final Result 2020: यूपीएससी परीक्षेत शुभम कुमार देशात अव्वल

UPSC Final Result 2020: यूपीएससी परीक्षेत शुभम कुमार देशात अव्वल

Subscribe

यूपीएससीने नागरी सेवा २०२० चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. शुभम कुमार या परीक्षेत देशात अव्वल आला आहे. यूपीएससीच्या मते, नागरी सेवा परीक्षेत जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे. आयएएस अधिकारी आणि २०१५ बॅचची टॉपर टीना डाबी यांची बहीण रिया डाबी हिनेही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. रिया डाबीने १५ वी रँक मिळवली आहे. बिहारचा शुभम कुमार या परीक्षेत पहिला आला असून आयआयटी मुंबईमधून त्याने सिविल इंजिनीयरिंग बीटेकमध्ये पदवी घेतली तर जागृती अवस्थी परीक्षेत दुसरी आली आहे. तिने MANIT भोपाळमधून इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग बीटेक केले आहे.

- Advertisement -

नागरी सेवा परीक्षा २०२० मध्ये ७६१ उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यापैकी ५४५ पुरुष आणि २१६ महिला आहेत.उत्तीर्ण झालेल्या पहिल्या २५ जणांमध्ये १३ विद्यार्थी आणि १२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर एकूण उत्तीर्ण उमेदवारांमधील विद्यार्थ्यांची संख्या ५४५, तर विद्यार्थिनींची संख्या २१६ इतकी आहे.

यूपीएससी दरवर्षी नागरी सेवा परीक्षा तीन टप्प्यात घेते ज्यामध्ये प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांचा समावेश असतो. या परीक्षांच्या माध्यमातून, उमेदवारांची भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) आणि भारतीय पोलीस सेवा (IPS) यासह इतर विविध सेवांसाठी निवड केली जाते. जानेवारी २०२१ मध्ये लेखी आणि सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मुलाखती झाल्या होत्या. यातून यामध्ये खुल्या प्रवर्गातून २६३ तर आर्थिक मागास प्रवर्गातून ८६, अन्य मागास प्रवर्गातून २२९ तर अनुसूचित जाती १२२, अनुसूचित जमाती ६१ उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.


गोमांस नेणारा टेम्पो पकडला, नाशिकमधील घटनेत चालक ताब्यात

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -