घरदेश-विदेशCovid-19 Vaccine : अमेरिकेच्या आरोग्य सल्लागारांची J&J लसीच्या बूस्टर डोसला मान्यता

Covid-19 Vaccine : अमेरिकेच्या आरोग्य सल्लागारांची J&J लसीच्या बूस्टर डोसला मान्यता

Subscribe

अमेरिकेच्या आरोग्य सल्लागारांनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोनाविरोधी लसीच्या बूस्टर डोसला शुक्रवारी मान्यता दिली आहे. ज्या अमेरिकन नागरिकांनी सिंगल डोस शॉट घेतला आहे. ते दोन डोस घेतलेल्या नागरिकांइतके सुरक्षित नाही. असा दावा अमेरिकन आरोग्य सल्लागारांनी केला आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांना आता लसीचा बूस्टर डोस घेता येणार आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनने अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाला सांगितले की, लसीचा अतिरिक्त डोस प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्य़ानंतर दोन महिन्यांनंतर दिसल्य़ास तो अधिक सुरक्षा प्रधान करु शकतो. मात्र जर लोक सहा महिने प्रतिक्षा करु शकत असतील तर त्याचा परिणाम अधिकच चांगला दिसेल. एफडीएच्या सल्लागार समितीने एकमताने मतदान करत प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यानंतर किमान दोन महिन्यांनी बूस्टर डोस देण्याच्या निर्णयाला सहमती दर्शवली.

- Advertisement -

यावर फिलाडेल्फियाच्या चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे एफडीए सल्लागार डॉ. पॉल ऑफिट यांनी सांगितले की, दोन डोस असलेली ही लस होती. त्यामुळे या क्षणी एकच डोस लस म्हणून याची शिफारस करणे कठीण आहे.

दरम्यान वेगवेगळ्या लसींचे मिश्रण करत सुरु असलेल्या लसींवर संशोधनातून समोर येत आहे की, लसीचा बूस्टर डोस लोकांना कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी त्यांच्या अँटीबॉडीजचे प्रमाण वाढवत आहे. कमीत-कमी काही आठवड्यांसाठी का होईना अँटीबॉडीजचे प्रमाण वाढत आहे. तर नवीन संशोधन असेही सुचवते की, जॉन्सन अँड जॉन्सन लसीचा एक डोस आणि त्यांनंतर प्राप्तकर्त्यांना बूस्टर डोस प्रतिस्पर्धी ब्रँडचा दिल्यास प्रतिकारशक्ती अजून मजबूत होऊ  शकते. मात्र एफडीएने कोणत्याही लसीकरणानंतर किमान दोन महिन्यांनी १८ किंवा त्याहून अधिक वयाच्या कोणत्याही प्राप्तकर्त्यासाठी लसीचा बूस्टर डोस देण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -