घरCORONA UPDATEअमेरिका आणि भारत एकत्र कोरोनाची लस शोधणार - ट्रम्प

अमेरिका आणि भारत एकत्र कोरोनाची लस शोधणार – ट्रम्प

Subscribe

अमेरिका आणि भारत एकत्र येऊन कोरोना व्हायरसवर लस विकसीत करतील असा विश्वास अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. ही लस या वर्षाच्या अखेरपर्यंत बाजारात उपलब्ध होऊ शकते, असंही त्यांचं म्हणणं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत भारतीय-अमेरिकन एक महान वैज्ञानिक आणि संशोधक आहेत,  भारत आणि अमेरिका एकत्र येऊन कोरोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं.

तर एका मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, ‘मी काही दिवसांपूर्वी भारत दौरा केला असून भारतासोबत एकत्र येऊन काम करत आहे. अमेरिकेमध्ये भारतीय मोठ्या प्रमाणात असून त्यांच्यातील अनेक लोक लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते उत्तम वैज्ञानिक आणि संशोधक आहेत.’

- Advertisement -

ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी आपले चांगले मित्र असल्याचं सांगितलं. काही दिवसांनी कोरोना व्हायरसवर परिणामकारक लस बाजारात उपलब्ध होऊ शकते, असं ही सांगतिलं आहे.

- Advertisement -

व्हेंटिलेटरही करणार दान

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका भारताला व्हेंटिलेटर दान करणार असल्याचंही सांगितलं. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं असून ते म्हणाले की, ‘मला ही घोषणा करताना गर्व होत आहे की, संयुक्त राष्ट्र अमेरिका भारताला व्हेंटिलेटर दान करणार आहे. या कोरोना काळात  आम्ही भारत आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत. आम्ही लस तयार करण्यासाठीही मदत करत आहोत. आम्ही मिळून अदृश्य शत्रूला हरवणार आहोत.’


हे ही वाचा – Lockdown – अपघात मालिका सुरूच, ट्रकच्या भीषण अपघातात २४ मजूर जागीच ठार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -