घरCORONA UPDATEऔरेया अपघात : एक कप चहाने वाचवले मजुरांचे प्राण, नाही तर....!

औरेया अपघात : एक कप चहाने वाचवले मजुरांचे प्राण, नाही तर….!

Subscribe

शनिवारी पहाटे ३.३०च्या सुमारास हा अपघात झाला.

देशात वाढत चाललेल्या लॉकडाऊनमुळे मजुरांनी घरचा रस्ता धरला आहे. अनेक मजुर पायीच आपल्या गावी जाताना दिसत आहे. तर काही ठिकाणी ट्रक आणि बस सारख्या वाहनांनी पुढे जात राहतात. अशाच एका स्थलांतरीत मजुरांना घेऊन जाणाऱ्या दोन ट्रकची टक्कर झाली आहे. या भीषण अपघातात २४ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २२ मजुर जखमी झाले आहेत. पण या अपघातात २४ पेक्षा जास्त मजुरांचा मृत्यू झाला असता. पण त्या एक कप चहाने अनेक मजुरांचे प्राण वाचले.

शनिवारी पहाटे ३.३०च्या सुमारास उत्तरप्रदेशातील औरेयाजवळ हा अपघात झाला. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे मजूर बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खरतर हा रात्रभर प्रवास झाल्यानंतर आपल्या घरी पोहचणार होते मात्र सकाळचा सुर्य बघणं हे अनेकांच्या नशीबात नव्हतं. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अनेक कामगार एमएलएम थांबवून चहा पित असताना ही घटना घडली. नाहीतर मजुरांची संख्या जास्त झाली असती. जे मजुर चहा पिण्यासाठी खाली उतरले नाही ते या दुर्घटनेत मरण पावले.

- Advertisement -

औरैया येथे झालेल्या भीषण अपघातात २४ मजुरांचा मृत्यू झाला आहे. चुन्याच्या बोराने भरलेल्या ट्रकने डीसीएमला धडक दिली त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. मृतांमध्ये मुख्यत: पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमधील प्रवासी कामगार आहेत.


हे ही वाचा – अमेरिका आणि भारत एकत्र कोरोनाची लस शोधणार – ट्रम्प

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -