घरदेश-विदेशअमेरिकेतील तांत्रिक बिघाड दुरुस्त, विमानसेवा हळूहळू पूर्वपदावर

अमेरिकेतील तांत्रिक बिघाड दुरुस्त, विमानसेवा हळूहळू पूर्वपदावर

Subscribe

वॉशिंग्टन – संगणक प्रणालीत बिघाड झाल्याने अमेरिकेतील विमानांचे उड्डाण पूर्णपणे बंद झाले होते. मात्र, हा तांत्रिक बिघाड आता दुरुस्त करण्यात आला असून आता हळूहळू विमानसेवा पूर्ववत होत आहे.

नोटीस टू एअर मिशन सिस्टमच्या रात्रभराच्या आऊटेजनंतर अमेरिकेत सामान्य हवाई वाहतूक सेवा हळूहळू पूर्ववत होत आहे. ग्राऊंड स्टॉपला हटवण्यात आले आहे. आम्ही प्रारंभिक समस्येचे कारण शोधत आहोत, असं ट्वीट फेडरल एविएशन अॅडमिनिस्ट्रेशनने केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मोठी बातमी! अमेरिकेतील सर्व्हरमध्ये बिघाड, सर्व विमानांची उड्डाणे रद्द

अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी परिवहन विभागाला आउटेजची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कारण, हा तांत्रिक बिघाड नक्की कशामुळे झाला याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. या आउटेजमागे सायबर हल्ला असण्याची शक्यता आहे. मात्र, बिडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले की, “आम्हाला याबद्दल काहीही माहिती नाही.”

- Advertisement -


युएस फेडरल एविएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) प्रणालीअंतर्गत पायलट आणि इतर उड्डाण कर्मचाऱ्यांना संबंधित धोक्यांविषयी माहिती दिली जाते. तसंच, सामान्य कामजांवरही देखरेख केली जाते. मात्रा,  याच यंत्रणेतून कोणतीही माहिती पुरवली जात नव्हती. त्यामुळे अमेरिकेतील सर्व विमान सेवा ठप्प झाल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -