घरताज्या घडामोडीविमानात महिलेवर लघुशंकाप्रकरणी आरोपी मिश्राचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

विमानात महिलेवर लघुशंकाप्रकरणी आरोपी मिश्राचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Subscribe

विमान प्रवासात ज्येष्ठ महिलेवर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्राला पटियाला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर शंकर मिश्राने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, पटियाला न्यायलयाने शंकर मिश्राचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

विमान प्रवासात ज्येष्ठ महिलेवर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्राला पटियाला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर शंकर मिश्राने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, पटियाला न्यायलयाने शंकर मिश्राचा जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणी न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. (new delhi city urinating incident delhi patiala house court begins hearing on pea of shakar mishra)

विमानात महिलेवर लघुशंका केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी शंकर मिश्रा याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीवेळी अनेक तास निर्णय राखून ठेवल्यानंतर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळण्याचा निर्णय दिला.

- Advertisement -

दरम्यान, या घटनेतील आरोपी शंकर मिश्रा यांने मद्यधुंद अवस्थेत 70 वर्षीय महिलेवर लघुशंका केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी मिश्रा याच्याविरुद्ध कलम 254, 294, 509 आणि 510 अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच, त्याला बेंगळुरू येथून अटक केली.

गेतवर्षी 26 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती. लघुशंकेच्या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी मंगळूरु येथून मिश्राला अटक केली होती. तसेच, आरोग्य तपासणीनंतर त्याला पटियाला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी मिश्रा याला तीन दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली.

- Advertisement -

दरम्यान, न्यूयॉर्क ते दिल्ली प्रवासात एका ज्येष्ठ महिलेवर लघुशंका केल्याचा मिश्रावर आरोप आहे. तो अमेरिकन कंपनी वेल्स फार्गोच्या इंडिया चॅप्टरचा उपाध्यक्ष आहे. गेल्यावर्षी २६ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. मात्र या घटनेची माहिती उघड झाली नव्हती. अखेर पीडित महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन् यांना पत्र लिहिले. या घटनेचा सर्व तपशील पत्रात नमूद केला. कारवाईची मागणी केली. त्यांनतर याप्रकरणाची चौकशी सुरु झाली. त्यावेळी ही घटना उजेडात आली. या घटेनुमळे सर्वच थक्क झाले.


हेही वाचा – मुंबई मॅरेथॉनमध्ये हजारो सीनिअर सिटिझन्स धावणार, ९१ वर्षीय आजी आणि ८९ वर्षीय आजोबांचीही नोंदणी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -