घरदेश-विदेशभारतावर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांवर पाकिस्तान कारवाई करत नाही - अमेरिका

भारतावर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांवर पाकिस्तान कारवाई करत नाही – अमेरिका

Subscribe

अमेरिकेच्या या अहवालामुळे पाकिस्तान दहशतवादाला पाठीशी घालतो हा भारताचा दावा पुन्हा एकदा खरा ठरला आहे. 

भारतावर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांवर पाकिस्तान कोणत्याही प्रकारे कारवाई करत नाही, असे अमेरिकेने सांगितले आहे. अमेरिकेन परराष्ट्र मंत्रालयाने दहशतवादासंदर्भात सादर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानची पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे. अमेरिकेच्या या अहवालामुळे पाकिस्तान दहशतवादाला पाठीशी घालतो हा भारताचा दावा पुन्हा एकदा खरा ठरला आहे.

भारताचा दावा खरा ठरला

जागतिक स्तरावरील अनेक व्यासपीठांवर भारताने दावा केला आहे की, “पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी संघटनांचे तळ आहेत. या दहशतवाद्यांना पाकिस्तान पाठीशी घालत आहे. हेच दहशतवादी भारतामध्ये दहशतवादी हल्ले करतात. असे भारताने जागतिक व्यासपीठावर वारंवार सांगितले आहे. अमेरिकेच्या अहवालामुळे भारताचा हा दावा खरा ठरला आहे. अमेरिकेने सादर केलेल्या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले केलेल्या दहशतवादी संघटनांवरच पाकिस्तानने कारवाई केले आहे. पण भारतावर हल्ले करणाऱ्या, केलेल्या दहशतवादी संघटनांवर पाकिस्तानकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अमेरिकेच्या या अहवालामुळे पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी संघटनांचे तळ आहेत हा भारताचा दावा पुन्हा खरा ठरला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -