घरदेश-विदेशवैष्णोदेवी यात्रा पुन्हा सुरू २ हजार भाविकांना प्रवेश

वैष्णोदेवी यात्रा पुन्हा सुरू २ हजार भाविकांना प्रवेश

Subscribe

जम्मू काश्मीर प्रशासनानं १६ ऑगस्टपासून परवानगी दिली होती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली वैष्णोदेवी यात्रा रविवारपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर प्रशासनानं १६ ऑगस्टपासून वैष्णोदेवी यात्रा सुरू करण्याची परवानगी दिली होती.

देशात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मार्च महिन्यातच वैष्णोदेवीची यात्रा बंद करण्यात आली होती. दरम्यान, आता या यात्रेला परवानगी देण्यात आली असून पहिल्या आठवड्यात दररोज २ हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यापैकी १ हजार ९०० भारतीय आणि १०० परदेशी भाविकांना परवानगी दिली जाईल. जम्मू काश्मीर प्रशासनाने या यात्रेसाठी अनेक नियम तयार केल्याची माहिती श्राईन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कुमार यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -