घरदेश-विदेशभाजप नेत्यांच्या भडकावू पोस्टवर कारवाईस फेसबुकचा नकार

भाजप नेत्यांच्या भडकावू पोस्टवर कारवाईस फेसबुकचा नकार

Subscribe

फेसबुकच्या धोरणाबद्दल ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ दैनिकाचा धक्कादायक खुलासा

भारतात लोकप्रिय असलेल्या फेसबुकच्या धोरणाबद्दल ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या अमेरिकेतील अग्रगण्य दैनिकाने धक्कादायक खुलासा केला आहे. द्वेष आणि हिंसेला प्रोत्साहन देणार्‍या पोस्टवर कडक कारवाई करणार्‍या फेसबुकने भाजपा नेते आणि संबंधित काही ग्रुपबद्दल नरमाईची भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. फेसबुकने हिंसेला प्रोत्साहन देणार्‍या भाजपा नेत्यांच्या पोस्टवर कारवाई करण्यास नकार दिला आहे.

‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने फेसबुकच्या कारवाई न करण्याबद्दलच्या भूमिकेचा गौप्यस्फोट केला आहे. फेसबुकच्या भारतातील वरिष्ठ कार्यकारिणीने सत्ताधारी भाजपाशी संबंधित चार नेते आणि ग्रुप यांच्यावर द्वेष पसरवणार्‍या पोस्ट संदर्भात असलेले नियम लागू करण्यास विरोध केला आहे.

- Advertisement -

रिपोर्टनुसार फेसबुकच्या भारतातील पब्लिक पॉलिसी संचालक अंखी दास यांनी कर्मचार्‍यांना या संदर्भात सूचना दिल्या. भाजपा नेत्यांवर हिंसाचार पसरवणार्‍या पोस्टवरून कारवाई केल्यास कंपनीच्या भारतातील व्यावसायिक वाढीला धोका निर्माण होऊ शकतो, असे दास यांनी कर्मचार्‍यांना सांगितल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

भाजपच्या तेलंगणातील आमदार टी. राजा सिंह यांच्या द्वेष पसरवणार्‍या पोस्टचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या पोस्टमध्ये राजा हे अल्पसंख्याकांविरोधात हिंसा करण्याचं आवाहन करत आहेत. अंखी दास यांचा या प्रकरणातील हस्तक्षेप हा कंपनीने सत्ताधारी पक्षाविषयी अनुकूलता दर्शवल्याचा व्यापक स्वरूपाचा भाग आहे, असे फेसबुकमध्ये सध्या कार्यरत असलेल्या आणि माजी कर्मचार्‍यांनी सांगितले.

- Advertisement -

खाते बंद करावे

फेसबुकच्या अंतर्गत कर्मचार्‍यांचे असे मत आहे की, कंपनीच्या धोरणानुसार आमदाराचे खाते बंद करण्यात यावे. असे वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तात म्हटले आहे. दास यांनी राजकीय पडसादांविषयी चिंता व्यक्त केली होती; पण, सिंह यांना फेसबुकवर बंदी न घालण्याची इतरही अनेक कारणे आहेत, असे स्टोन यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -