घरदेश-विदेशअमेरिकेने 'वंदे भारत मिशन' मनमानी पद्धतीने चालवल्याचा भारतावर केला आरोप!

अमेरिकेने ‘वंदे भारत मिशन’ मनमानी पद्धतीने चालवल्याचा भारतावर केला आरोप!

Subscribe

कोरोनामुळे इतर देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना देशात आणण्यासाठी वंदे भारत मिशन अंतर्गत उड्डाणे चालविली जात आहेत.

कोरोना साथीच्या काळात भारत सरकारने परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी वंदे भारत मिशन सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत इतर देशांमध्ये अडकलेल्या बर्‍याच लोकांना पुन्हा देशात परत आणण्यात आले आहे. दरम्यान, अमेरिकेने वंदे भारत मिशन मनमानी पद्धतीने चालवल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेच्या वतीने असे म्हटले आहे की, या मोहिमेप्रमाणेच भारत एअर इंडियाची उड्डाणे मनमानी पद्धतीने चालवित आहे. अमेरिकेचा आरोप आहे की, अमेरिकन कॅरियरवर बंदी असताना भारताच्या वतीनेच प्रवाशांना तिकिटे विकली जात आहेत.

अमेरिकेच्या परिवहन विभागाचे म्हणणे आहे की, भारत सरकारने इतर देशांतून आपल्या देशात लोकांना आणण्याची एअर इंडियाचे उड्डाणांची व्यवस्था केली आहे, मात्र ही उड्डाणे भारताकडून मनमानी पद्धतीने चालविली जात आहेत. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, भारतात त्याच्या एअरलाईन्स (अमेरिकन एअरलाइन्स) साठी बंदी आहे, त्यामुळे अमेरिकन एअरलाइन्सचे नुकसान होत आहे. तसेच अमेरिकेचा आरोप आहे की, कोरोना विषाणूपूर्वी एअर इंडिया अधिक उड्डाणे चालवित आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या साथीमुळे भारताने देशांतर्गत उड्डाणे सुरू केली आहेत, परंतु आंतरराष्ट्रीय उड्डाणे अजूनही बंदी आहेत. कोरोना साथीच्या महामारीमुळे इतर देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना देशात आणण्यासाठी वंदे भारत मिशन अंतर्गत उड्डाणे चालविली जात आहेत.


पर्यटकांसाठी खुशखबर! ७ जुलैपासून पर्यटकांना दुबईला जाता येणार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -