घरताज्या घडामोडीUkraine-Russia War: सायकलस्वारावर थेट बॉम्बहल्ला; पाहा थरारक Video

Ukraine-Russia War: सायकलस्वारावर थेट बॉम्बहल्ला; पाहा थरारक Video

Subscribe

रशिया आता युक्रेनची राजधानी किववर कब्जा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण सातत्याने किवमध्ये रशियाचे हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यामध्ये युक्रेनच्या सर्वसामान्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. युक्रेनमधील अनेक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यापैकी एक व्हिडिओ पाहून तुम्ही हैराण व्हाल. यामध्ये एका सायकलस्वार प्रवास करत असताना अचानक बॉम्ब हल्ला होताना दिसत आहे.

- Advertisement -

दरम्यान रशियाला प्रत्युत्तर देण्यासाठी युक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की (President Volodymyr Zelensky) स्वतः युद्धाच्या मैदानात उतरले आहेत. युक्रेनमध्ये हल्याच्या पहिल्याच दिवशी १३७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३१६ जण जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत पुतीन म्हणाले की, ‘जर रशियाच्या कारवाईत कोणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर यापूर्वी कधीही न पाहिलेले परिणाम होतील.’ पुतीन यांनी थेट नाटो आणि अमेरिकेला इशारा दिला आहे.

काल, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये बातचित केली. यावेळी रशियाला चर्चेतून वाद मिटवा हिंसेचा मार्ग सोडा, असे मोदी पुतीन यांना म्हणाले. अजूनही युक्रेन एकटे लढत आहेत. युक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की म्हणाले की, ‘रशियासोबत लढण्यासाठी युक्रेनला एकटे सोडले गेले आहे. आमच्यासोबत लढण्यासाठी कोण उभे आहे? मला काही दिसत नाही. युक्रेनला नाटो सदस्यत्वाची हमी देण्यासाठी कोण तयार आहे? प्रत्येक जण घाबरत आहे.’

- Advertisement -

हेही वाचा – Russia Ukraine War : रशियाने मिळवला चेर्नोबिल अणू प्रकल्पावर ताबा, युक्रेनचा दावा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -