घरदेश-विदेशमोदींच्या सभेनंतर जमावाने केली एका पोलिसाची हत्या

मोदींच्या सभेनंतर जमावाने केली एका पोलिसाची हत्या

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये एका महिन्यात दुसऱ्यांदा जमावाकडून एका पोलिसाची हत्या करण्यात आली आहे. बुलंदशहर येथे सुबोध कुमार सिंग यांची गोळी झाडून हत्या केल्यानंतर काल गाझीपुर येथे एका पोलिस शिपायाचा दगडफेकीत मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशच्या गाजीपुर जिल्ह्यात काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होता. मोदी यांच्या दौऱ्यानंतर एका स्थानिक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार दगडफेक केली. या दगडफेकीत एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसाच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत जाहीर केले आहे, तसेच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. गाजीपुरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक यशवीर सिंह यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रीय निषाद पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केले होते. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांनी रोखून धरले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम झाल्यानंतर निषाद पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रॅलीच्या ताफ्यावर दगडफेक करायला सुरुवात केली. यावेळी हे आंदोलन परतवून लावण्यासाठी पोलीस शिपाई सुरेश वत्स (४८) बंदोबस्तावर होते. दगडफेक होत असताना सुरेश यांच्या डोक्याला एक दगड लागला. यातच ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

- Advertisement -

मृत झालेले पोलीस शिपाई सुरेश हे प्रतापगड जिल्ह्यातील रानीगंज येथील रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूनंतर लखनऊचे पोलीस अधिकारी अवनीश अवस्थे यांनी निवदेन करुन सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी सुरेश यांच्या पत्नीला चाळीस लाख रुपये आणि त्यांच्या माता-पितांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली, असल्याचे सांगितले.

- Advertisement -

वाराणसीचे अतिरीक्त पोलीस अधीक्षक पी व्ही रामाशास्त्री यांनी सांगितले की, आतापर्यंत ११ हल्लेखोरांना अटक करण्यात आले आहे. डोक्याला दगड लागल्यामुळेच सुरेश यांचा मृत्यू झाला होता, असेही त्यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -