घरदेश-विदेशVirat Kohli चा निर्णय : टी-20 World Cup नंतर सोडणार कर्णधारपद

Virat Kohli चा निर्णय : टी-20 World Cup नंतर सोडणार कर्णधारपद

Subscribe

सोशल मीडियावर पोस्ट टाकत केली घोषणा, अन्य जबाबदाऱ्या मात्र कायम

T20 वर्ल्ड कप तोंडावर असतानाच कर्णधार विराट कोहलीने T20 च्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट टाकत तशी घोषणा केली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चा खऱ्या ठरल्या. कोहली T20 कर्णधारपद सोडणार असला तरीही वन डे आणि कसोटीमधील त्याचे कर्णधारपदी कायम राहणार आहे.

कोहलीने सोशल मीडियावरुन दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या T 20 वर्ल्ड कपनंतर तो टी 20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. याबाबत कोहलीची रवी शास्त्री, रोहीत शर्मा व अन्य सहकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. T20 कर्णधारपदाच्या राजीनाम्यामुळे त्याला वन-डे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदाकडे लक्ष केंद्रीत करता येईल. कामगिरीतही सातत्य राखता येईल. कारण गेल्या ८ ते १० वर्षांपासून कोहली तिन्ही पातळ्यांवरील कर्णधारपदाची धूरा सांभाळतोय. त्यामुळे त्याच्यावर जबाबदारीचा भार आहे. यातून काही काळ मुक्त होण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -