घरव्हिडिओमानवाला अंतर्मुख करायला लावणारा व्हिडिओ

मानवाला अंतर्मुख करायला लावणारा व्हिडिओ

Related Story

- Advertisement -
सध्या जगभरात कोरोनाचे संकट आहे. अशावेळी माणसंच घरामध्ये लॉक़डाऊन झाली आहेत. या काळात माणसाने निसर्गाची आतापर्यंत किती हानी केली. त्याची जाणीव करून देणारा हा व्हिडिओ आहे. आपण जे निसर्गाला देतो, त्याचीच परतफेड निसर्ग आता आपल्याला करून देत असल्याचे या व्हिडिओतून सांगितले जात आहे. शिवाय प्राण्यांच्याही बाबतीत कधी कधी खुपच अन्यायकारक वागणूक होत आहे. त्याबाबतही मानवाला सुनावले आहे. ही वेळ आत्मपरिक्षण करण्याची अंतर्मुख होण्याची आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा काळ माणसाने या विचारासाठी वापरावा आणि येणाऱ्या काळात तरी निसर्गाचा समतोल राखला जाईल, याची काळजी घ्यावी, असा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून दिला गेला आहे. 
- Advertisement -