Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश जायचे होते जॅक्सनव्हिलला, पण पोहोचवले जमैकाला... अमेरिकन एअरलाइन्सची चूक पडली महागात

जायचे होते जॅक्सनव्हिलला, पण पोहोचवले जमैकाला… अमेरिकन एअरलाइन्सची चूक पडली महागात

Subscribe

फ्लोरिडा : विमान प्रवासांत मद्यधुंद प्रवाशांनी धिंगाणा घातल्याच्या घटना वरचेवर घडतच आहेत. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई देखील केली जात आहे. पण अलीकडेच मद्याच्या एका थेंबालाही स्पर्श न करता एका अमेरिकन एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी गोंधळ घालून ठेवल्याचे समोर आले आहे. फ्रंटियर एअरलाइन्सने (Frontier Airlines) चुकून न्यू जर्सीच्या (New Jersey) एका महिलेला जॅक्सनव्हिलऐवजी (Jacksonville) थेट जमैकाला (Jamaica) नेऊन सोडले आणि तेही पासपोर्टशिवाय! गेट बदलत असताना एका महिलेबाबत हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते.

- Advertisement -

न्यूयॉर्क पोस्टने ही माहिती दिली आहे. ग्लुसेस्टर काऊंटी येथील रहिवासी बेव्हरली एलिस-हेबार्ड (Beverly Ellis-Hebard) असे या महिलचे नाव आहे. ती नियमितपणे फिलाडेल्फियाहून जॅक्सनव्हिलमधील तिच्या दुसऱ्या घरी जाते. मी दर सहा आठवड्यांनी एकदा फ्लाइटने तिथे जाते. यावेळी मी फ्रंटियर एअरलाइन्सने जाण्याचे ठरविले. मी अनेकदा याच एअरलाइन्सने गेले आहे, असे त्यांनी सांगितले. मी 6 नोव्हेंबर रोजी फ्लाइटसाठी गेटवर आली, ज्यात पीएचएल टू जेएएक्स (PHL to JAX) असे लिहिले होते. हेबार्डने सांगितले की त्यांनी एजंटला प्रसाधनगृहात जाण्यासंदर्भात विनंती केली. मात्र, ती परत आली तेव्हा विमान भरले होते. गेट बदलत असताना तिला चुकीच्या विमानात नेण्यात आले.

या संपूर्ण प्रकरणावर फ्रंटियर एअरलाइन्सने खेद व्यक्त केला आहे. आम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. तथापि, महिला प्रवासी चुकीच्या फ्लाइटमध्ये गेली असली तरी, आम्ही माफी मागतो. आम्ही संबंधित महिलेला तिकीट दरपरतावा तसेच नुकसान भरपाई दिली आहे, असे फ्रंटियर एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले.

- Advertisement -

प्रवाशांचे गैरवर्तन
गेल्या काही दिवसांपासून विमानात गैरवर्तन करण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अलीकडेच अमेरिकन एअरलाइन्सचे विमान AA 292 मध्ये आरोपी भारतीय नागरिकाने दारूच्या नशेत आधी सहप्रवाशासोबत वाद घातला आणि त्यानंतर त्याने लघुशंका केल्याचा माहिती एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी दिली. विमान कंपनीने विमान उतरवण्यापूर्वी दिल्ली विमानतळाला या प्रकरणाची माहिती दिली होती. रविवारी (23 एप्रिल) रात्री 9 वाजता दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरताच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) आरोपीला ताब्यात घेतले.

- Advertisment -