घरदेश-विदेशती महिला २० वर्षे पुरूष बनून जगली

ती महिला २० वर्षे पुरूष बनून जगली

Subscribe

एखाद्यी व्यक्ती स्त्री असताना देखील तिला तिच्या स्त्रीत्वाची जाणीव होऊ न देता, तब्बल २० वर्षे पुरुष म्हणून वागविले तर… बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा रुद्रमादेवी नावाचा चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता. त्या चित्रपटाला साजेशी अशीच ही कथा आहे. अशक्य वाटत असलं तरी हे वास्तव आहे. जन्मत: स्त्री असून सुध्दा २० वर्षे पुरुष बनून जीवन जगल्याची एका वेगळ्या प्रकारची घटना केरळमध्ये निदर्शनास आली आहे. या महिलेला जेव्हा तिच्यातील बदल जाणवले त्यानंतर तिने केलेल्या वैद्यकीय तपासणीत हा उलगडा झाला.

का ‘ती’ बनली ‘तो’ ?

- Advertisement -

या महिलेचे नाव चित्रा असे असून, डॉक्टरांनी तिच्या शरिरात X (स्त्रीयांच्या शरिरातील जनुके) आणि Y (पुरुषांच्या शरिरातील जनुके) ही दोन्ही जनुके समान असल्याचे सांगितले होते. तसेच जन्माच्यावेळी तिच्या अंगावर खुप सारे केसही होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्या पालकांना जन्मलेले बाळ हे मुलगा असल्याचे सांगितले आणि केवळ याच कारणामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला मुलगा म्हणूनच सांभाळले. तब्बल २० वर्षे तिचे पालन मुलगा म्हणूनच झाले. सोबतच तिच्या पालकांनी तिच्यातील पुरुषांच्या जनुकांमध्ये वाढ व्हावी, यासाठी अनेक इंजेक्शने सुध्दा दिली. याचा परिणाम तिच्या शारीरिक वाढीवर दिसून आला. तिच्या मुत्राशयाची योग्य वाढ झाली नाही. इतर मुलींच्या तुलनेत तिची उंची खुप वाढली. स्त्रीचे सर्व अंतर्गत अवयव असतांनासुध्दा तिच्या स्तनामध्ये वाढ झाली नाही.

शाळेतील दिवस

- Advertisement -

चित्रा सांगते की, तिला जन्मापासूनच मुलगा म्हणून वाढवले. शाळेतही तिला मुलाचे नाव देऊन नोंदणी केली गेली. त्यामुळे तिला शाळेत शिक्षण घेतांना मुलांच्याच रांगेत बसून शिक्षण घ्यावे लागले. तिला पुरुषांचेच कपडे घालावे लागायचे. एवढेच नाही तर तिला पुरुषांचेच प्रसाधनगृह सुध्दा वापरावे लागत असे. बऱ्याचदा प्रसाधनगृहामध्ये तिला लघवी करतांना अडचण यायची. त्यामुळे सोबतची मुलं तिला चिडवायची. अशा घटनांमुळे ती शाळेत जाणे टाळायची. या सर्वांचा तिच्या शिक्षणावर खूप परिणाम होत होता. मोठी झाल्यावर तर ती शाळेत फक्त परीक्षा द्यायलाच जायची.

तिला केव्हा उमगले?

वयाच्या १४ वर्षी जेव्हा तिच्या शरीरात बदल व्हायला लागले. तेव्हा इतर मुलांपेक्षा आपण वेगळे असल्याचा अनुभव आला. तिला असे लक्षात आले की, तिच्या बरोबरीच्या मित्रांच्या आवडींपेक्षा तिच्या आवडी खुप वेगळ्या आहेत. तिच्या मित्रांप्रमाणे तिला मुलींंची छेड काढणे किंवा ‘तशा’ भावना बाळगण्यात काहीच रस वाटत नव्हता. उलट मुलींच्या त्या गोष्टींमध्ये तिला रस यायला लागला, जसे ज्वेलरी, मेक-अप, कपडे इत्यादी.

तिच्या या वेगळ्या आवडीमुळे आणि शरीरात होत असलेल्या बदलांमुळे आपण नपुंसकलिंगी तर नाही ना.. असे तिला सारखे वाटत होते. त्यामुळे तिने तिच्या आई-वडिलांना तिच्या जन्माबाबतची सर्व माहिती विचारली. त्यानंतर तिने तिच्या आई-वडिलांना हे पटविण्याचा खुप प्रयत्न केला की, तिला या सर्व गोष्टींचा खूप त्रास होतोय. त्यानंतर तिने केलेल्या वैद्यकिय तपासणीमध्ये लक्षात आले की, जन्माच्यावेळी डॉक्टरने सांगितल्या प्रमाणे तिच्या शरिरात X आणि Y जनुकांचे प्रमाण समान जरी असले तरी, तिच्या शरीरात जन्मत:च सर्व अवयव हे स्त्री-लिंगी आहेत. त्यामुळे ती एक स्त्रीच आहे. तिला हार्मोन्सची इंजेक्शने दिली नसती तर कदाचित तिच्या शरीरात पुरुषांशी निगडित बदल झाले नसते आणि ती स्वतंत्रपणे स्त्री म्हणूनच जगू शकली असती.

‘तो’ चा ‘ती’ बनल्यानंतर

‘तो’ चा ‘ती’ झाल्यानंतर तिला बऱ्याच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. २० वर्षे पुरुष म्हणून जगल्यानंतर अचानक ती स्त्री म्हणून जगायला लागल्यावर, अनेक लोक तिच्याकडे तुच्छ नजरेने पाहायला लागले. तिला बालपणापासून ओळखणाऱ्या सर्वांना ती स्त्री म्हणून स्वीकारणे खुप अवघड गेले. याबाबतचा एक किस्सा तिने सांगितला, ‘लहान वयात शिक्षण घेताना ज्या शिक्षिकांनी तिला पुरुष म्हणून बघितले, तेच शिक्षक आता डिग्रीचे शिक्षण घेताना तिला स्त्री म्हणून पाहत होते. इतके सर्व घडले तरी सुध्दा चित्राला कोणालाही दोष द्यायचा नाही. उर्वरित जीवन केवळ एक स्त्री म्हणून जगायची इच्छा असल्याचे तिने म्हटले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -