घरदेश-विदेश'INDIA' आघाडीतून पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...

‘INDIA’ आघाडीतून पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले…

Subscribe

नवी दिल्ली : सत्ताधारी पक्षाच्या ‘NDA’ आघाडीला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षाने त्यांच्या आघाडीचे नाव ‘INDIA’ असे ठेवले आहे. या आघाडीची पहिली बैठक पाटणा, दुसरी बंगळुरुमध्ये पार पडल्यानंतर तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. अशातच ‘इंडिया’ आघाडी भविष्यात सत्तेवर आल्यास पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. अशातच अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी सोमवारी (14 ऑगस्ट) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देशाच्या पुढील पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितो, असे मोठे वक्तव्य केले आहे. (Who is the prime ministerial candidate from INDIA alliance Shatrughan Sinha said)

हेही वाचा – Congress VS Bjp : भाजपा समर्थकांना ‘या’ कॉंग्रेस नेत्याने म्हटले राक्षस; भाजपकडून होतोय विरोध

- Advertisement -

‘इंडिया’ आघाडीविषयी बोलताना पत्रकारांनी शत्रुघ्न सिन्हा यांना प्रश्न विचारला की, तुम्ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून ते कसे पाहतात? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचे नाव घेतले. त्यांनी म्हटले की, सध्या काळात राष्ट्रपतीपदी एक महिला असल्यावर पंतप्रधानपदीही एक महिला असेल तर, ही गोष्ट देशासाठी खूप चांगली असेल. ममता बॅनर्जी फायरब्रँड नेत्या आहेत. त्यांच्याकडे मोठा जनसागर आहे. त्या पंतप्रधानपदासाठी एकदम फिट बसतात, असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

हेही वाचा – Aditya-L1 Mission : भारत करणार सूर्यनमस्कार; चांद्रयान – 3 नंतर ISROकडून विशेष मिशन आदित्य L-1 लाँच

- Advertisement -

एनडीएकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय दुसरा नेता नाही

एनडीएवर निशाणा साधताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, पंतप्रधान कोण असेल याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. कारण भारतात टॅलेंटची कमतरता नाही. यावेळी त्यांनी ठामपणे सांगितले की, आमच्याकडे युवा नेतृत्व राहुल गांधी आहेत. ज्यांच्याकडे देश आपले भविष्य म्हणून पाहतो आहे. आमच्याकडे आधुनिक काळातील चाणक्य शरद पवार आहेत आणि अर्थातच आमच्याकडे फायरब्रँड लीडर ममता बॅनर्जी आहेत. पण भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय दुसरा नेता नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

हेही वाचा – Independence Day : स्वातंत्र्यदिनी 954 पोलिसांना पोलीस पदकांनी गौरविणार; महाराष्ट्राला किती पदके?

भ्रष्टाचारावर भाजपाची भूमिका स्पष्ट

भ्रष्टाचारावर भाजपाची भूमिका स्पष्ट असे म्हणताना शभुघ्न सिन्हा म्हणाले की, भाजपा विरोधी आघाडीवर टीका करण्यासाठी भ्रष्टाचार आणि घराणेशाही यासारख्या मुद्द्यांवर बोलतात. परंतु एनडीएचा माजी नेता या नात्याने मी दावा करतो की, जेव्हा घराणेशाहीचा प्रश्न येतो तेव्हा भाजपा आणि त्यांचे मित्र पक्ष कोणाच्याही मागे नाहीत. पण महाराष्ट्रात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याशी पंतप्रधानांनी युती केली तेव्हा त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -