घरठाणेThane Kalwa hospital death : चौकशीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करू-मुख्यमंत्री

Thane Kalwa hospital death : चौकशीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करू-मुख्यमंत्री

Subscribe

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, घडलेली घटना ही दुर्दैवी असून, मी आज स्वतः वॉर्डामध्ये जाऊन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केली. हे रुग्णालय 500 घाटांचे असून, यामध्ये सध्या 550 ते 600 रुग्ण अॅडमीट आहेत.

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला आज सायंकाळी भेट दिली. यावेळी त्यांनी वॉर्डामध्ये जाऊन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन चौकशी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, घडलेली घटना दुर्दैवी असून, या घटनेच्या मुळाशी जाऊन चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी समिती गठीत करण्यात आली असून, पुढील दहा दिवसांत अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या चौकशी अहवालानंतरच दोषींवर कारवाई करु असेही ते यावेळी म्हणाले. (Thane Kalawa hospital death: We will take action against the culprits after the inquiry report – Chief Minister)

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, घडलेली घटना ही दुर्दैवी असून, मी आज स्वतः वॉर्डामध्ये जाऊन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केली. हे रुग्णालय 500 घाटांचे असून, यामध्ये सध्या 550 ते 600 रुग्ण अॅडमीट आहेत. बेड कमी आहेत म्हणून लॉबीमध्ये बेड टाकून रुग्णांवर उपचार केले जातात ते मी आज पाहले. आलेला रुग्ण जागा नाही म्हणून माघारी पाठविला जात नाही, त्यामुळे, डीन, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर असे दिसून आले की, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा या रुग्णालयावर विश्वास आहे. त्यामुळे रुग्णालयावर लोड वाढला आहे. घटना घडल्यानंतरही 91 रुग्ण नव्याने अॅडमीट झाले तर 22 रुग्णांवर शस्त्रक्रियासुद्धा झाली. झालेली घटना दुर्दैवी आहे, त्याची चौकशी होईल, अहवाल आल्यानंतर कारवाईही करु परंतू या रुग्णालयावरचा भार पाहल्यानंतर जे डॉक्टर, नर्स काम करतात ते नाउमेद होऊ नये म्हणून उगीच कुणावरही कारवाई करणे योग्य ठरणार नाही.

- Advertisement -

ठाणे शहरच नाही तर जिल्ह्याबाहेरील रुग्णही घेतात उपचार

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या रुग्णालयावर रुग्णांचा विश्वास आहे. त्यामुळे ठाणे शहरच नाही तर जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील रुग्णही येथे उपचारासाठी येतात. त्यामुळे या रुग्णालयावरचा अधिक वाढतो असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा : Thane : कळवा रुग्णालयात मृत्यूचे सत्र सुरूच; एका महिन्याच्या बाळासह चार रुग्णांचा मृत्यू

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी सांगितले मृत्यूची कारणे

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या रुग्णालयात 18 जणांचा मृत्यू झाला ही वस्तुस्थिती आहे. परंतू मी माहिती घेतली असता या मृत्यूची कारणे वेगवेगळी आहेत. काही लोक क्रोनिक हार्ट डीसीजने तर काही पॅरालिसीस स्ट्रोकने, लंग डिसीजने,अल्सर कंप्लीकेशन तर एकजण रस्ता अपघातातील तर एकजण केरोसीनच्या पॉयझिनिंगच्या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : ठाण्याच्या रुग्णालयातील 18 रुग्णांच्या मृत्यूवर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

दर दिवसाला 2 हजार 200 ची ओपीडी

रुग्णालयावर येणाऱ्या ताणाविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, घडलेल्या घटनेचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई करू, सगळी मी डिटेल माहिती घेतली. जी चर्चा होतेय त्याच्या मुळाशी जाणं आवश्यक आहे. शेकडो हजारो रुग्ण या रुग्णालयात येतात. या रुग्णालयात दरदिवशी 2100 ते 2200 ची ओपीडी आहे. क्रिटीकल पेशंटही येथे येतात, त्यामुळे रुग्णलयातील डॉक्टारांवर ताण येतोच असेही ते यावेळी म्हणाले. शेवटी जबाबदारी म्हणून आमची आहे. अशा दुर्दैवी घटनांचे राजकारण न करता, रुग्णांचा जीव कसा वाचेल यासाठी प्रयत्न करा, तर या रुग्णालयात ज्या उपचाराच्या चांगल्या बाबी आहेत त्यासुद्धा सांगा असे आवाहनही त्यांनी यावेळी विरोधकांना केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -