गृहराज्यमंत्र्यांच्या घराबाहेर बिबट्याचे दर्शन, म्हणाले घावला असता तर शिवबंधन….

leopards near shambhuraj desai house daultanagar patan said shivbandhan tie
गृहराज्यमंत्र्यांच्या घराबाहेर बिबट्याचे दर्शन, म्हणाले घावला असता तर शिवबंधन....

राज्याचे गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांच्या दौलतानगर येथील निवासस्थानी बिबट्याचे शुक्रवारी दर्शन झाले. घराच्या बागेतून बिबट्या फेरफटका मारुन गेला त्यावेळी देसाई घरात कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत होते. सुरक्षा रक्षकाने पाहिल्यानंतर बिबट्याचा पाठलागही केला. जर बिबट्या सापडला असता तर त्याला १०० टक्के शिवबंधन बांधले असते अशी मिश्किल प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे. पंरतु परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पाटण दौऱ्यावर असून दौलतानगर येथील निवासस्थानी थांबले आहेत. घराजवळ बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर परिसरात राहत असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. शंभूराज देसाई यांना बिबट्या घराजवळ आलेला असा प्रश्न पत्रकार परिषदेदरम्यान विचारला असता ते म्हणाले की, वाघाकडेच वाघ येणार भेटायला. यानंतर बिबट्याला शिवबंधन बांधले असते का? असे विचारल्यावर घावला असता तर १०० टक्के शिवबंधन बांधले असते असे शंभराज देसाई यांनी म्हटलं आहे.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई दौलतानगरमध्ये असल्यामुळे दिवसभर त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. संध्याकाळी गर्दी ओसरली होती. यानंतर देसाई बैठक घेत असताना घराबाहेर बिबट्या बागेतून फेरफटका मारुन गेला. सुरक्षारक्षकाचे लक्ष गेल्यानंतर बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. बिबट्याचा वावर आता घरापर्यंत होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

शिवसेनेचं बोट धरुन मोठे झाला हे विसरु नका

शिवसेनेचे खासदार भाजपच्या जिवावर निवडून आले असून जे घरात बसलेत त्यांनी देशाच्या राजकारणात जाण्याची स्वप्ने पाहू नये अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावर गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरुन भाजप महाराष्ट्रात पुढे आली हे विसरु नका, शिवसेनेमुळेच भाजपचे खासदार निवडून आले आहेत. जर विसर पडला असेल तर अडवाणींना विचारा असा सल्ला देसाई यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेला कोणता आधार नाही. पाटील नैराश्येतून बोलून वल्गना करत असल्याचा घणाघात शंभूराज देसाई यांनी दिला आहे.


हेही वाचा : ‘मी पंतप्रधान मोदींसारखा नापास झालो नाही, माझं मार्कशीट पाहा’, कन्हैया कुमारचा पुण्यातून भाजपवर निशाणा