घरदेश-विदेशविंग कमांडर अभिनंदन यांना पाठीचे दुखणे!

विंग कमांडर अभिनंदन यांना पाठीचे दुखणे!

Subscribe

पाकिस्ताच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्थमान मायदेशी परतले खरे, मात्र त्यांच्यामागील त्रास काही कमी होताना दिसत नाही. अभिनंदन यांच्या पाठीच्या कण्याला जखम झाल्याचे मेडिकल चाचणीमधून समोर आले आहे. विमान क्रॅश होताना पॅराशूटच्या साहाय्याने अभिनंदन विमानातून बाहेर पडले होते. मात्र, पॅराशूटमधून उतरल्यानंतर पाकच्या स्थानिक नागरिकांनी केलेल्या मारहाणीमध्ये त्यांच्या पाठीच्या कण्याला जखम झाली. याशिवाय पॅराशूटमधून उतरताना पाठीच्या खालच्या बाजूलाही जखम झाल्याचे एमआरआयनंतर समोर आले आहे. अभिनंदन यांना अंतर्गत जखम झाली आहे का? तसंच पाकिस्तानने हेरगिरीसाठी त्यांच्या शरीरात काही यंत्रं लावली आहेत का? हे पाहण्यासाठी त्यांची चाचणी करण्यात आली. यावेळी त्यांच्या पाठीचा मणक्याला दुखापत झाल्याचं समोर आलं.

दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार पुढील १० दिवसांत अभिनंदन यांच्या आणखी काही चाचण्या होणार असून, त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. दुसरीकडे पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून शारीरिक छळ केला नसल्याचे आणि काही प्रमाणात मानसिक छळ केल्याचे अभिनंदन यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

अभिनंदन यांच्याशी ‘डीब्रिफिंग’

भारतीय सुरक्षा दलांनी रविवारी अभिनंदन यांच्याशी संपूर्ण घटनेविषयी चर्चा केली. लष्कराच्या भाषेत त्याला ‘डीब्रिफिंग’ म्हटले जाते. सुरक्षा दलाच्या संकेतानुसार हे डीब्रिफिंग चालते. हवाई दलाच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन यांची रविवारी भेट घेतली. लष्कराच्या रुग्णालयात अभिनंदन यांच्या वैद्यकीय चाचण्या सलग दुसऱ्या दिवशीही सुरू होत्या. सुरक्षा दलाच्या ‘कूलिंग डाउन’ प्रक्रियेनुसार अभिनंदन यांच्या सर्व वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत. पुढील काही दिवस  ही प्रक्रिया अशीच सुरु राहणार आहे.

दरम्यान, अनेक राज्यातील राजकीय नेते, सुरक्षा तज्ज्ञ, माजी सैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांकडून अभिनंदन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शत्रूंच्या ताब्यात असूनही अत्यंत खंबीरपणे सर्व प्रसंगाना सामोरे गेलेले अभिनंदन भारातची शान असल्याच्या प्रतिक्रिया देशवासीय देत आहेत. संरक्षण दलांच्या उर्वरित प्रक्रिया पार पडल्यानंतर अभिनंदन पुन्हा सेवेत रुजू होतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -