घरमुंबईआज महाशिवरात्री; महादेवाच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

आज महाशिवरात्री; महादेवाच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

Subscribe

महाशिवरात्रीच्या निमित्ताने महादेवाच्या मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

बम बम भोले… हर हर महादेव…चा गरज आज सर्वत्र घुमत आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने महादेवाच्या मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातच नव्हे तर देशभरातील भक्त मंदिरात जाऊन शंकराच्या पिंडीवर दुधाचा, फुलांचा अभिषेक करत आहेत. आज पहाटेपासूनच भाविकांनी महादेवाच्या मंदिराबाहेर दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. मुंबईतील बुलेश्वर, वाळकेश्वर, अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, पुण्यातील ओंकारेश्वर, साताऱ्यातील बुलेश्वर, परळीतील ओंढा नागनाथ सारख्या अनेक प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांनी एकच गर्दी केली आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने देशभर शंकराच्या मंदिरांमध्ये विशेष पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सद्गुगुरू जग्गी वासुदेव यांच्या तामिळनाडू येथील आश्रमात  होणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही मुंबईतील शंकर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.


१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचं देवस्थान असलेलं ठिकाण म्हणजे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर. आज भाविकांनी महादेवाच्या पिंडीला अभिषेक करण्यासाठी एकच गर्दी केली.

- Advertisement -

  • पाहायला विसरू नका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -