घरदेश-विदेशसमानता आहे कुठे; महिलांना पुरुषांपेक्षा १९ टक्के कमी वेतन

समानता आहे कुठे; महिलांना पुरुषांपेक्षा १९ टक्के कमी वेतन

Subscribe

महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. त्यांच्या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक होते. आपल्या समाजात त्यांना समानतेची वागणूक दिली जाते. एका सर्वेक्षणानुसार देशातील महिला नोकरदारांचे वेतन पुरुष नोकरदारांच्या तुलनेत सरासरी १९ टक्के कमी असल्याचे आढळून आले आहे.

महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. त्यांच्या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक होते. आपल्या समाजात त्यांना समानतेची वागणूक दिली जाते. मात्र काही ठिकाणी अजूनही महिला आणि पुरुष असा भेदभाव गेला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एका सर्वेक्षणानुसार देशातील महिला नोकरदारांचे वेतन पुरुष नोकरदारांच्या तुलनेत सरासरी १९ टक्के कमी असल्याचे आढळून आले आहे. ‘मॉन्स्टर सॅलरी इंडेक्स’नुसार (एमएसआय) देशात अद्याप ‘जेंडर पे गॅप’ असल्याचे आढळून आले असून, पुरुष नोकरदार महिला नोकरदारांच्या तुलनेत ताशी ४६.१९ रुपये अधिक सरासरी वेतन घेत असल्याचे दिसून आले आहे.

गेल्या १० वर्षात वेतनामधील अंतर वाढले 

गेल्या वर्षी देशातील पुरुष आणि महिला नोकरदारांना अनुक्रमे ताशी २४२.४९ रुपये आणि १९६.३ रुपये सरासरी वेतन मिळत होते. या सर्वेक्षणानुसार बऱ्याच क्षेत्रांमध्ये दोघांच्या वेतनामधील तफावत आजही कायम असल्याचे दिसून आले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पुरुष कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महिलांना २६ टक्के कमी वेतन, तर उत्पादन क्षेत्रातील महिलांना पुरुषांच्या तुलनेत २४ टक्के कमी वेतन मिळत असल्याचे आढळले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आरोग्य, आरोग्यनिगा आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत पुरुषांचे वेतन महिलांच्या तुलनेत २१ टक्क्यांनी अधिक असल्याचे समोर आले आहे. या क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या आणि दबदबा अधिक असूनही वेतनामध्ये पुरुष सहकारीच वरचढ असल्याचे दिसून आले आहे. सर्वेक्षणानुसार बँकिंग आणि विमासारख्या वित्तीय क्षेत्रांमध्ये पुरुष सहकारी महिलांच्या तुलनेत दोन टक्के अधिक वेतन घेतात. असे असले तरी, दोघांच्या वेतनामधील अंतर १० वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत जात असल्याचेही दिसून आले आहे.

- Advertisement -

सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली 

२०१७ महिला आणि पुरुष नोकरदारांच्या वेतनातील फरक २० टक्के असल्याचे आढळून आले. मात्र, नोकरदार स्त्रियांचे हक्क आणि अधिकार यांच्याबाबतची जागृती होत असल्याने २०१८ मध्ये त्यांच्या वेतनातील फरक एक टक्क्याने घटून १९ टक्क्यांवर पोहोचल्याचे दिसून आले. ‘मॉन्स्टर डॉट कॉम’ने देशभरातील नोकरदार महिलांच्या कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या समस्यांच्या संदर्भात ‘विमेन ऑफ इंडिया इंक’ हे सर्वेक्षणही केले. त्यामध्ये ७१ टक्के पुरुष आणि ६६ टक्के महिलांनी नोकरीच्या ठिकाणी लैंगिक समानता असण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. जवळपास ६० टक्के महिलांनी नोकरीच्या ठिकाणी भेदभाव होत असल्याचे स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -