घरदेश-विदेशप्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर 'ती' महिला पुन्हा जगू लागली

प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर ‘ती’ महिला पुन्हा जगू लागली

Subscribe

प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर एका महिलेला २७ वर्षांनी पुन्हा जीवनदान मिळाले आहे. २७ वर्षांपूर्वी एका अपघातात तिच्या डोक्याला मार लागल होता. त्यामुळे ही महिला कोमात गेली होती.

जगण्याची प्रचंड इच्छाशक्तीमुळे एका महिलेला २७ वर्षांनी पुन्हा जीवनदान मिळाले आहे. या महिलेचा २७ वर्षांपूर्वी अपघात झाला होता. तेव्हापासून ही महिला कोमात गेली होती. २७ वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरु होते. परंतु, डॉक्टरांनी तिची जगण्याची आशा सोडली होती. मात्र मुलाच्या प्रेमामुळे आणि जगण्याच्या प्रचंड इच्छाशक्तीमुळे ती कोमातून बाहेर आली आहे. या महिलेचे नाव मुनीरा अबदुल्ला असे आहे. अपघात त्यावेळी मुनीरा ३२ वर्षांच्या होत्या. आपल्या ४ वर्षाच्या मुलाला शाळेतून घरी आणताना हा अपघात घडला.

काय आहे नेमकं प्रकरण?

युएई देशात वास्तव्यास असलेल्या मुनीरा यांचा २७ वर्षांपूर्वी म्हणजे १९९१ साली फार मोठा अपघात झाला होता. मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी त्या गेल्या होत्या आणि नेमके त्याचवेळी हा अपघात घडला. या अपघातात मुलाचा जीव वाचवण्यात मुनीरा यशस्वी झाल्या. मात्र, त्यांच्या डोक्यावर गंभीर जखम झाली. त्यामुळे त्या कोमात गेल्या. मुनीरा त्यातून आता बाहेर येणार नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितले होते. परंतु, मुनीरा यांची जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती आणि मुलाने केलेली सेवा यामुळे त्या कोमातून बाहेर येऊ शकल्या. आता मुनीरा बसू शकता, बसून बोलू शकतात आणि पाहू शकतात. यासंदर्भात बोलताना मुनीरा यांचा मुलगा उमर वेबएर म्हणाला की, मी कधीच हार मानली नाही. माझी आई नक्की एका दिवशी नक्की बरी होईल, असा माझा विश्वास होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -