घरदेश-विदेशशिकण्याची जिद्द असेल तर जगण्याला नवी ऊर्जा मिळते - पंतप्रधान मोदी

शिकण्याची जिद्द असेल तर जगण्याला नवी ऊर्जा मिळते – पंतप्रधान मोदी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तरुणांना संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवकांना संबोधित केलं. पंतप्रधान म्हणाले की आजचा दिवस २१ व्या शतकातील तरुणांना समर्पित आहे. आज कौशल्य ही तरुणांची सर्वात मोठी शक्ती आहे. बदलत्या पद्धतींनी कौशल्य बदललं आहे. आज आपले तरुण बर्‍याच नवीन गोष्टींचा अवलंब करीत आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

कोरोना संकटात आजच्या युगात कसं पुढे जायचं असा प्रश्न लोक विचारतात. कौशल्य अधिक बळकट करणे हा एकच मंत्र आहे. आता आपल्याला नेहमीच नवीन कौशल्य शिकावं लागेल. पंतप्रधान म्हणाले की प्रत्येक यशस्वी व्यक्तीने त्यांची कौशल्ये सुधारण्याची संधी शिकली पाहिजे. शिकण्याची जिद्द असेल तर जगण्याला नवी उर्जा मिळते, असा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिला आहे.

- Advertisement -

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की प्रत्येकाने आपलं कौशल्य सतत बदलणं आवश्यक आहे ही काळाची गरज आहे. माझ्या ओळखींपैकी एक, जो मला आठवत आहे, तो फार शिकलेला नव्हता परंतु त्याचं हस्ताक्षर खूप चांगलं होतं. काळानुसार त्याने त्यात बरेच बदल केले, त्यानंतर लोक त्याच्याकडून काम करु लागले. प्रत्येकाची स्वतःची क्षमता असते, जी आपल्याला इतरांपेक्षा वेगळी बनवते. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक स्किल इंडिया मिशनला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने कौशल्य विकास मंत्रालयाच्या वतीने डिजिटल कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं आहे.


हेही वाचा – भाजपमध्ये जाणार नाही; पायलट यांनी वाढवला सस्पेंस

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -