घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाअशोक पाटोळे यांचा प्रबोधन करणारा बाप्पा

अशोक पाटोळे यांचा प्रबोधन करणारा बाप्पा

Subscribe

कांदिवली येथे राहणारे अशोक किसन पाटोळे हे कलाशिक्षक आहेत. गेली ३१ वर्ष ते विविध विषयांवर सामाजिक प्रबोधन करणारे देखावे निर्माण करत आहेत. आजवर त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरे करण्याचे त्यांचे हे दुसरे वर्ष आहे. पाटोळे यांनी पंचधातुच्या श्रीगणेशाची मुर्तीची प्रतिष्ठापणा केली आहे. त्यांच्या घरी पाच दिवसांसाठी बाप्पा विराजमान झालेला आहे.

- Advertisement -

पाटोळे यांनी विसर्जनासाठी घरोसमोरील अंगणात ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठात मूर्तीवर जलाभिषेक करतात. यावर्षी सजावट करण्यासाठी त्यांनी अवकाशातील ग्रहताऱ्यांना भेटणारे चंद्रयान दाखवले आहे. “आकाशातील ग्रह माणसांच्या जीवनावर परिणाम करतात किंवा काय? हा वादाचा विषय होऊ शकेल, पण माणसे एकमेकांबद्दल जे ग्रह करून घेतात. ते मात्र माणसांच्या जीवनावर निश्चित परिणाम करतात.”, असा सुंदर संदेश पाटोळे यांनी लिहिलेला आहे.

Contestant Ashok Patole 1

- Advertisement -

 

स्पर्धकाचे नाव – अशोक पाटोळे

पत्ता – आनंदवन सह.गृह.संस्था ७०७/२२, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई – ४०० ०६७

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -