घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाआर्थिक निकषांवर आरक्षणाची मागणी करणारा पुष्पम कदम यांचा बाप्पा

आर्थिक निकषांवर आरक्षणाची मागणी करणारा पुष्पम कदम यांचा बाप्पा

Subscribe

“नको जातीवर आधारित आरक्षण!
हवे आर्थिक निकषांवर आरक्षण!” या घोषवाक्यासहीत मुंबईतील पुष्पम कदम यांनी आपला इको फ्रेंडली बाप्पा साकारला आहे. आरक्षणासोबतच कदम यांनी झोपडपट्टी, दंगे, संस्था, चांद्रयान यासारख्या चित्रांचा सजावटीमध्ये समावेश केलेला आहे. बाप्पांच्या मागे एक सुंदर झाडाची प्रतिकृती उभी केलेली आहे.

आरक्षण हा भारतात नेहमी चर्चिला जाणारा शब्द. दर पाच दहा वर्षांनी तो एखाद्या समाजाबरोबर प्रकाशात येतो. यावेळी निमित्त होते ते गुजरातच्या पाटीदार पटेल समाजाचे. आरक्षणाची चर्चा होते, तेव्हा दोन्ही बाजुंनी मोठ्या प्रमाणावर मतमतांतरे होतात. जो समाज स्वतः आरक्षित आहे, तो दुसऱ्या समाजाला आरक्षण मिळून आपला वाटा कमी होऊ नये म्हणून विरोध करतो. ज्यांना आरक्षण मिळवायचे आहे त्यांची आरक्षणाशिवाय आपला विकास, प्रगती नाही अशी खात्री झालेली असते. स्वातंत्र्य मिळाल्याच्या ७० वर्षांनंतरही आपण आरक्षणापलिकडे विचार करायला शिकलो नाही ही मोठी शोकांतिका आहे.

- Advertisement -

ज्या काळात जातींच्या भिंती नष्ट व्हायला हव्या होत्या व एकसंघ समाज निर्माण व्हायला हवा होता त्या काळात आरक्षणामुळे जातीच्या भिंती मोठ्या होत आहेत. आताची परिस्थिती पाहता आर्थिक निकषांवर आरक्षण असावे असे वाटते कारण प्रत्येक गरिबाला याचा लाभ मिळेल. त्यामुळे जातीआधारित आरक्षणाचा पुनःर्विचार करण्याची आता खरी वेळ आलेली आहे. आर्थिक निकषांवरील आरक्षणामुळे सामाजिक विषमता नष्ट होण्यास व सामाजिक समता तसेच समरसता निर्माण होण्यास मदत होणार आहे.

स्पर्धकाचे नाव – पुष्पम देवेंद्र कदम

- Advertisement -

पत्ता – अमर भारत सेवा मंडळ, भगवा महाल, सातरस्ता, जेकॉब सर्कल, हेंस रोड, मुंबई – ११

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -