घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

एक चातुर्य शहाणें झालें / प्रमेय रूचीस आलें / आणि सौभाग्य पोखलें / सुखाचें एथ //
या कथेपासून चातुर्य शहाणे झाले. तत्वार्थाला जास्त रूची आली आणि सुखाच्या सौभाग्याची वृद्धी झाली.
माधुर्यीं मधुरता / शृंगारी सुरेखता / रूढपण उचितां / दिसलें भलें //
माधुर्याला मधूरपणा, शृंगाराला सुरेखपणा व योग्य वस्तूस श्रेष्ठपण येऊन त्या सर्व उत्तम रितीने शोभू लागल्या.
एथ कळाविदपण कळां / फण्याशी प्रतापु आगळा / म्हणौनि जनमे जयाचे अवलीळा / दोष हरले //
कथेपासूनच कलांना कौशल्य प्राप्त झाले व फण्याचा प्रताप वाढला. म्हणूनच (अठरा दिवसांत भारताची अठरा पर्वे ऐकल्यामुळे) जनमेजयाचे (ब्रह्महत्येचे) दोष नाहीसे झाले.
आणि पाहतां नावेक / रंगीं सुरमगातेची आगळीक / गुणां सगुणपणाचें बिक / बहुवस एथ //
आणि क्षणभर पाहू लागले असता शृंगारादिक रसांस विशेष सुरेखपणा आला व गुणाला चांगल्या गुणांचे विशेष सामर्थ्य या कथेने आले.
भानुचेनि तेजें धवळलें / जैसें त्रैलोक्य दिसे उजकिलें / तैसें व्यासमती कवळिलें / मिरवे विश्व //
ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर त्रैलोक्यावर उजेड पडतो, त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीतून ही कथा निघाल्यामुळे सर्व जगावर उजेड पडून ते शोभले.
कां सुक्षेत्रीं बीज घातलें / तें आपुलियापरी विस्तारलें / तैसें भारतीं सुरवाडलें / अर्थजगत //
किंवा चांगल्या शेतात बी पेरले असता त्याचा जसा उत्तम विस्तार होतो, तसे या भारती कथेंत सर्व विषय शोभिवंत झाले आहेत.
ना तरी नगरांतरीं वसिजे / तरी नागराचि होईजे / तैसें व्यासोक्तितेजें / धवळत सकळ //
अथवा नगरात राहिल्यावर ज्याप्रमाणे मनुष्य शहाणा होतो, त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीच्या तेजामुळे सर्व जग ज्ञानमय झाले.
की प्रथमवयसाकाळीं / लावण्याची नव्हाळी / प्रकटे जैसी आगळी / अंगनाअंगी //
तसेच तारुण्यदशेत सौंदर्याची शोभा स्त्रियांच्या अंगी जशी विशेष दृष्टीस पडते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -