घरसंपादकीयदिन विशेष‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर

Subscribe

बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. ‘दर्पण’ हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. त्यांचा जन्म ६ जानेेवारी १८१२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले या ठिकाणी झाला. जांभेकरांनी बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास केला. १८२५ मध्ये मुंबईस येऊन त्यांनी सदाशिव काशीनाथ उर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे इंग्रजी, संस्कृत शिकले.

याबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. १८३४ साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या १० भाषांचे ज्ञान होते. त्यांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांच्यावर शोधनिबंध लिहिले. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हाती दिली. त्यांना रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र याचे उत्तम ज्ञान होते.

- Advertisement -

हे लक्षात घेऊन तत्कालीन सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक केली. या काळामध्ये त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. शिक्षणाच्या संदर्भामध्ये मोलाची भूमिका बजावली. महाराष्ट्रात शिक्षण प्रसाराचे सुरुवातीच्या अवस्थेत निरनिराळ्या विषयांवरील अभ्यासासाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे अतिशय कठीण असे काम या काळामध्ये त्यांनी केले. इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र अशा विविध विषयांवरील मराठी भाषेतील पहिली पाठ्यपुस्तके त्यांनीच लिहिली. अशा या व्यासंगी पत्रकाराचे १७ मे १८४६ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -