घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

देखा षड्दर्शनें म्हणिपती / तेचि भुजांची आकृती / म्हणोनि विसंवादें धरिती / आयुधेंहातीं //
असे पाहा की, सहा शास्त्रे हेच गणपतीचे सहा हात होत.
तरी तर्कु तोचि फरशु / नीतिभेदु अंकुशु / वेदान्तु तो महारसु / मोदकु मिरवे //
तेव्हा तर्कशास्त्र हा फरशु, न्यायशास्त्र हा अंकुश आणि वेदांतशास्त्र हे गोड व रसाळ मोदकाच्या ठिकाणी शोभते.
एके हातीं दंतु / जो स्वभावता खंडितु / तो बौद्धमतसंकेतु / वार्तिकाचा //
वार्तिककारांच्या व्याख्यानाने स्वभावतःच खंडित झालेले बौद्धमत हे एका हातात असणार्‍या मोडक्या दातांच्या ठिकाणी शोभते.
मग सहजें सत्कारवादु / तो पद्मकरू वरदु / धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु / अभयहस्तु //
मग कल्याणकारक व वरदायक असा जो हस्त आहे तो सत्कारवाद म्हणजे ब्रह्मविषयक वाद होय. धर्म आणि प्रतिष्ठा यांची ज्यापासून स्थापना होते, तो अभयहस्त होय.
देखा विवेकवंतु सुविमळु / तोचि शुंडादंडु सरळुं / जेथ परमानंदु केवळु / महासुखाचा //
ज्याठिकाणी महासुखाचा परमानंद आहे तो अति निर्मळ विचार हाच सरळ सोंडेचा सोट होय.
तरी संवादु तोचि दशनु / जो समता शुभ्रवर्णु / देवो उन्मेषसुक्ष्मेणु / विघ्नराजु //
तसेच उत्तम संवाद हा सरळ व शुभ्र दातांचे ठिकाणी असून ज्ञानदृष्टी म्हणजे त्या विघ्नराजाचे सुक्ष्म नेत्र होत.
मज अवगमलिया दोनी / मामांसा श्रवणस्थानी / बोधमदामृत मुनी / अली सेविती //
पूर्व व उत्तर या मीमांसा मला कानांच्या ठिकाणी भासल्या, बोधामृत हा गंडस्थलांतून निघणारा मद व त्याचे सेवन करणारे मुनी हेच भ्रमर होत.
प्रमेयप्रवाल सुप्रभ / द्वैताद्वैत तेचि निकुंभ /सरिसेपणे एकवटत इभ / मस्तकावरी //
त्यांतील प्रमेये हीच गंडस्थलावरील पोवळ्यांच्या ठिकाणी असून एकाच तात्पर्याचे असे द्वैताद्वैत सिद्धांत हे गंडस्थलाच्या ऐवजी शोभतात.
उपरि दशोपनिषदें / जियें उदारें ज्ञानमकरंदे / तियें कुसुमें मुगुही सुगंधें / शोभती भली //
त्या गंडस्थलावरील टवटवीत व सुगंधी फुले म्हणजे मकरंदाने परिपूर्ण असलेली दशोपनिषदे होत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -