घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

मग काश्मिरीचे स्वयंभ । कां रत्नबीजा निघाले कोंभ । अवयवकांतीची भांब । तैसी दिसे ॥
मग केसराच्या स्वयमेव रंगासारखी अथवा रत्नरूप बीजाला निघालेल्या अंकुशसारखी त्या अवयवकांतीची झाक दिसते.
नातरी संध्यारागींचे रंग । काढूनि वळिलें तें आंग । कीं अंतर्ज्योतीचें लिंग । निर्वाळिलें ॥
नाहीतर संध्याकाळच्या आकाशाच्या रंगाची लाली काढून ते अंग बनविले असावे; अथवा आत्मचैतन्याच्या तेजाचे लिंग केले असावे;
कुंकुमाचें भरींव । सिद्धरसाचें वोतींव । मज पाहतां सावेव । शांतिचि ते ॥
किंवा ते कुंकुमाने भरलेले आणि आत्मरसाने ओतलेले अथवा ती मूर्तिमंत शांतीच असावी असे मला वाटते.
ते आनंदचित्रींचे लेप । नातरी महासुखाचें रूप । कीं संतोषतरूचें रोप । थांवलें जैसें ॥
ते आनंदरूपी चित्राचा रंग किंवा परब्रह्म सुखाचे रूप अथवा संतोषरूपी वृक्षाचे रोप आहे असे वाटते.
तो कनकचंपकाचा कळा । कीं अमृताचा पुतळा । नाना सासिंनला मळा । कोंवळिकेचा ॥
तो सोनचाफ्याचा कळा किंवा अमृताचा पुतळा अथवा नाजुकपणाचा भर आलेला असा मळाच,
हो कां जे शारदियेचेनि वोलें । चंद्रबिंब पाल्हेलें । कां तेजचि मूर्त बैसलें । आसनावरी ॥
शरदऋतूच्या पौर्णिमेच्या ओलाव्याने चंद्रबिंब शोभावे किंवा जणूकाय मूर्तिमंत तेजच आसनावर बसावे,
तैसें शरीर होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पीये । मग देहाकृति बिहे । कृतांतु गा ॥
त्याप्रमाणे, कुंडलिनी चंद्रामृताच्या तळ्यातील अमृत पियाल्यावर शरीर दिसू लागते; मग त्या शरीराला यमदेखील भितो!
वार्धक्य तरी बहुडे । तारुण्याची गांठी विघडे । लोपली उघडे । बाळदशा ॥
वृद्धपणा मागे फिरतो, तारुण्याची ज्वानी मोडते आणि गेलेली बाल्यावस्था पुनःप्राप्त होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -