घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

देखा संतोषु एक न जोडे । तंवचि सुखाचें सैंघ सांकडें । मग जोडलिया कवणीकडे । अपुरें असे? ॥
असे पहा की, जर एक संतोष प्राप्त न झाला तर चोहीकडे सुखाची उणीव असते; परंतु तो एकदा प्राप्त झाला म्हणजे मग जिकडे तिकडे सुखच सुख;. (सुखाची कोठेच उणीव नाही.)
तैसा सर्वेश्वरु बळिया सेवकें । म्हणौनि ब्रह्मही होय तो कौतुकें । परि कैसा भारें आतला पिकें । दैवाचेनि ॥
त्याचप्रमाणे, जो सर्वेश्वराचा पूर्ण सेवक बनला आहे, तो सहज ब्रह्मरूपी होऊ शकेल; पण अर्जुन सुदैवाच्या पिकाच्या भाराने किती वाकला आहे पहा;
जो जन्मसहस्रांचियासाठीं । इंद्रादिकांही महागु भेटी । तो आधीनु केतुला किरीटी । जे बोलुही न साहे ॥
जो ईश्वर हजारो जन्मानी इंद्राला सुद्धा भेटण्यास दुर्मीळ आहे, तो अर्जुनाच्या इतका आधीन झाला आहे की, त्याचा शब्दही खाली पडू देत नाही.
मग ऐका जें पांडवें । म्हणितलें म्यां ब्रह्म होआवें । तें अशेषही देवें। अवधारिलें ॥
तेव्हा ऐका की, अर्जुनाने मी ब्रह्म व्हावे असे जे म्हटले ते देवांनी सर्व ऐकिले.
तेथ ऐसेंचि एक विचारिलें । जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले । परि उदरा वैराग्य आहे आलें । बुद्धीचिया ॥
त्या वेळेस देवाच्या मनात असा विचार उत्पन्न झाला की, अर्जुनाला ब्रह्म होण्याविषयीचे डोहाळे लागले आहेत. यावरून त्याच्या बुद्धीच्या उदरात वैराग्याचा गर्भ राहिला आहे.
एर्‍हवीं दिवस तरी अपुरे । परी वैराग्यवसंताचेनि भरें । जे सोहंभाव महुरें । मोडोनि आला ॥
अथवा, अर्जुन हा नूतन झाड असूनही वैराग्यरूप वसंताच्या भाराने अहंब्रह्मरूप मोहराने ओथंबला आहे!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -